पालिका कर्मचा:यांनाच आसरा नाही

By Admin | Updated: September 6, 2014 01:07 IST2014-09-06T01:07:45+5:302014-09-06T01:07:45+5:30

आपत्कालीन परिस्थितीमध्ये सामान्य लोकांची मदत करणा:या पालिका कर्मचा:यांना पालिकेच्याच घरात वास्तव्यासाठी जागा मिळत नसल्याचे भीषण चित्र चेंबूरमध्ये पाहायला मिळत आहे.

The municipal staff is not the only refuge | पालिका कर्मचा:यांनाच आसरा नाही

पालिका कर्मचा:यांनाच आसरा नाही

समीर कणरुक - चेंबूर
आपत्कालीन परिस्थितीमध्ये सामान्य लोकांची मदत करणा:या पालिका कर्मचा:यांना पालिकेच्याच घरात वास्तव्यासाठी जागा मिळत नसल्याचे भीषण चित्र चेंबूरमध्ये पाहायला मिळत आहे. पालिकेच्या मालकीची घरे असताना काही राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने या घरांवर भूमाफियांनी कब्जा केला आहे. त्यामुळे  कर्मचा:यांच्या कुटुंबीयांना जीव मुठीत धरून दिवस काढण्याची वेळ आली आहे.
1962 साली महापालिकेने साफसफाई कामगारांसाठी चेंबूरच्या पी.एल. लोखंडे मार्गावर एकूण 16 इमारती बांधल्या. त्यानंतर 1977 साली  आणखी 4 नवीन इमारतींची त्यात भर पडली. या इमारतींमध्ये सध्या 4क्क् पालिका कर्मचारी कुटुंबीयांसह राहत आहेत. मात्र, गेल्या काही वर्षात पालिकेकडून या इमारतींची डागडुजी न झाल्याने यातील काही इमारतींची सध्या अत्यंत दयनीय अवस्था आहे. पावसाळ्यात  इमारतींमधील छतावरील पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे सतत छतातून पाणी गळत राहते. त्यामुळे कर्मचा:यांना आपल्या कुटुंबासहित रात्रभर जागरण करावे लागते. 
अनेकदा तर छताचे प्लास्टर निखळून जेवणात पडण्याच्या घटनाही रोजच या रहिवाशांना अनुभवण्यास मिळतात. इमारतीच्या बाजूने घाणीचे साम्राज्य पसरल्यामुळे उंदीर, घुशींनी इमारतीचा  पाया  पोखरून  टाकला आहे. तळमजल्यावर राहणा:या  कुटुंबांच्या घरात तर उंदरांनी हैदोस घातला आहे. भिंतींना आणि बाल्कनींना मोठमोठे तडे गेल्याने त्यामधून स्लॅब कोसळण्याच्या घटनादेखील रोजच घडतात.
याबाबत येथील कर्मचा:यांनी अनेकदा पालिकेच्या वरिष्ठ अधिका:यांना भेटून आणि पत्रव्यवहार करून व्यथा मांडल्या. मात्र, पालिकेने याकडे नेहमीच काणाडोळा केला. वर्षभरापूर्वीच येथील इमारत क्रमांक 3 मधील छताचा स्लॅब मोठय़ा प्रमाणात कोसळू लागल्याने येथील रहिवाशांनी याबाबत तक्रार केल्यानंतर पालिका अधिका:यांनी याची पाहणी करून इमारतीला धोकादायक घोषित केले. त्यानंतर काही दिवसांपूर्वी पालिकेने या इमारतीच्या पुनर्वसनासाठी प्रस्ताव आखला. यासाठी येथील रहिवाशांना इमारत तयार होईर्पयत चेंबूरमधील घाटला गाव येथे असलेल्या महादेव पाटीलवाडी येथील पालिकेच्या घरांमध्ये पाठवण्याचे ठरवले. एसआरए अंतर्गत बांधण्यात आलेल्या या इमारतीमध्ये पालिकेच्या मालकीची 23 राखीव घरे आहेत. 
पालिका अधिका:यांनी 3 नंबर इमारतीमध्ये राहणा:या 12 कुटुंबीयांना पहिल्यांदा त्या ठिकाणी हलवण्याचे ठरवले. त्यानुसार त्यांना घरांच्या चाव्याही देण्यात आल्या. मात्र, आठ दिवसांपूर्वी पालिका कर्मचारी आणि अधिकारी या घरांचा ताबा घेण्यासाठी त्या ठिकाणी गेले असता, एका वरिष्ठ राजकीय नेत्याने आणि काही लोकांनी या घरांचा ताबा या कर्मचा:यांना देण्यास विरोध दर्शवला. पालिका अधिकारीदेखील या नेत्यापुढे तोंड उघडू शकत नव्हते. त्यामुळे काहीही न बोलता हे अधिकारी कर्मचा:यांना घेऊन कार्यालयात परतले. 
पावसाळ्याचे दिवस असल्याने सध्या राहत असलेली इमारत कोसळण्याची भीती या कर्मचा:यांना आहे. त्यामुळे लवकरच आमचे पुनर्वसन करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच पाटीलवाडीमधील घरे पालिकेच्या मालकीची असताना या नेत्यांकडून हा विरोध का होत आहे, याच्या चौकशीची मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे. 
 
कारवाई का नाही?
च्एखाद्या सामान्य इसमाने अशाप्रकारे पालिकेच्या घरावर कब्जा केल्यास पालिका तत्काळ पोलिसांच्या मदतीने घर खाली करून ताबा घेते. मात्र, या ठिकाणी पालिकेने काहीच कारवाई केलेली नाही. त्यामुळे पालिकेच्या अधिका:यांवर राजकीय दबाव तर नाही ना, असा सवाल आता रहिवाशांकडून  उपस्थित करण्यात येत आहे.
 
कर्मचा:यांना हीच जागा सोयीस्कर
च्गेल्या 5क् वर्षापासून पालिकेचे हे कर्मचारी लोखंडे मार्गावरील या पलिका वसाहतीमध्ये राहत आहेत. त्यामुळे त्यांच्या मुलांची शाळा, कॉलेज याच परिसरात आहे. पालिकेने पाटीलवाडीतील ही जागा उपलब्ध करून दिल्यास सर्वानाच सोयीस्कर होणार आहे. मात्र, या घरांवर राजकीय नेत्यांच्या आशीवार्दाने काही भूमाफियांनी कब्जा केल्याने राहायचे तरी कुठे, असा प्रश्न या कर्मचा:यांना पडला आहे.
 
 याबाबत मालमत्ता विभाग अधिक चौकशी करत आहे. चौकशीनंतर त्यांच्याकडून योग्य ती कारवाई करण्यात येईल.
- संध्या नांदेडकर, साहाय्यक आयुक्त, एम पश्चिम विभाग

 

Web Title: The municipal staff is not the only refuge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.