गोरेगावच्या अनधिकृत हुक्का पार्लरवर महापालिकेचा हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:05 IST2020-12-09T04:05:51+5:302020-12-09T04:05:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई: गोरेगाव (प.) येथील एस. व्ही. रोडवर रॉयल हुक्का पार्लर नावाने सुमारे ६,००० चौ.फूट क्षेत्रफळावर अनधिकृतपणे ...

Municipal hammer on unauthorized hookah parlor in Goregaon | गोरेगावच्या अनधिकृत हुक्का पार्लरवर महापालिकेचा हातोडा

गोरेगावच्या अनधिकृत हुक्का पार्लरवर महापालिकेचा हातोडा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई: गोरेगाव (प.) येथील एस. व्ही. रोडवर रॉयल हुक्का पार्लर नावाने सुमारे ६,००० चौ.फूट क्षेत्रफळावर अनधिकृतपणे हुक्का पार्लर चालविण्यात येत होता. बृहन्मुंबई महानगरपालिकेने सदर अनधिकृत बांधकामावर मनपा अधिनियम ३५१ अन्वये कारवाई करून निष्कासनाची कारवाई केली.

पी दक्षिण वॉर्डचे प्रभाग समिती अध्यक्ष व स्थानिक भाजपा नगरसेवक हर्ष पटेल यांनी येथील नागरिकांच्या तक्रारीवरून पालिका प्रशासनानी पाठपुरावा केला होता. आज अखेर या पालिकेने हुक्का पार्लरवर हातोडा मारल्याबद्दल येथील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला.

सदर कारवाई पी/दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त संतोषकुमार धोंडे यांच्या मार्गदर्शानाख़ाली कार्यकारी अभियंता (इमारत व कारखाने) संजय सोनवणे, सहायक अभियंता मंदार चौधरी, दुय्यम अभियंता परेश शाह यांच्यामार्फत सदर तोडक कारवाई करण्यात आली.

सदर कारवाईदरम्यान गोरेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोस्वामी, ८ ते १० पोलीस अधिकारी सुमारे २५ पोलीस वर्ग व पी दक्षिण विभागाचे इतर संबंधित कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

-----------------*---------------------

Web Title: Municipal hammer on unauthorized hookah parlor in Goregaon