मेट्रोच्या मार्गात अडथळा ठरणाऱ्या ‘व्यायामशाळे’वर पालिकेचा हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:06 IST2021-09-22T04:06:39+5:302021-09-22T04:06:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मेट्रोच्या मार्गात अडथळा ठरणाऱ्या विलेपार्लेतील हाजरा फाउंडेशन ट्रस्ट या व्यायामशाळेवर मंगळवारी महापालिकेने हातोडा फिरवला. ...

Municipal hammer on the 'gymnasium' which is an obstacle in the way of Metro | मेट्रोच्या मार्गात अडथळा ठरणाऱ्या ‘व्यायामशाळे’वर पालिकेचा हातोडा

मेट्रोच्या मार्गात अडथळा ठरणाऱ्या ‘व्यायामशाळे’वर पालिकेचा हातोडा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मेट्रोच्या मार्गात अडथळा ठरणाऱ्या विलेपार्लेतील हाजरा फाउंडेशन ट्रस्ट या व्यायामशाळेवर मंगळवारी महापालिकेने हातोडा फिरवला. पालिका के/पश्चिम वॉर्डच्या हद्दीत मोडणाऱ्या खेळाच्या मैदानावर याचे बांधकाम करण्यात आले होते. त्यानुसार ४८ तासांची नोटीस बजावत सहायक आयुक्तांनी ही कारवाई केली.

पालिकेच्या के/पश्चिम विभागातर्गत खेळाचे मैदान टिळक गार्डन या नावाने ओळखले जाते. यावर हाजरा फाउंडेशन ट्रस्ट नामक व्यायामशाळा उभारण्यात आली होती. मुंबई महानगर विकास प्राधिकरणतर्फे मुंबई मेट्रो लाइन-२ बी (डी. एन. नगर, मंडाळे)चे काम हाती घेण्यात आले. ज्यात जुहू सर्कल येथे असलेल्या अंधेरी व्हिलेजमधील इमारती बाधित होत असल्याने त्यांना विलेपार्ले व्हिलेज येथे स्थलांतरित करण्याची विनंती मुंबई महानगर विकास प्राधिकरणाकडून करण्यात आली होती.

हा परिसर म्हाडाच्या अभिन्यासातील असून विलेपार्ले व्हिलेज येथील २ हजार ३४५ चौरस मीटर क्षेत्र हस्तांतरित करण्याची विनंती म्हाडा प्राधिकरणाने केली. त्यानुसार मंगळवारी हाजरा फाउंडेशन ट्रस्ट या व्यायामशाळेवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. मुंबईच्या विकासाचा भाग असलेली मेट्रो या मार्गावरून जाणार असल्याने ही व्यायामशाळा त्या मार्गातील मोठा अडथळा बनली होती. त्यानुसार ट्रस्टला पालिकेकडून ४८ तासांत जागा रिकामी करण्याची नोटीस बजावत तोडक कारवाई केली गेली. त्यामुळे मेट्रोच्या मार्गातील मोठा अडथळा दूर करण्यात पालिकेला यश मिळाले. तसेच अन्य प्रकल्पबाधितांचेही योग्य नियमांतर्गत पुनर्वसन करत ही कारवाई पूर्ण करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

‘स्टे' मिळण्यापूर्वीच केली कारवाई

आम्ही या ट्रस्टला १७ सप्टेंबर रोजी ४८ तासांची मुदत दिल्यावर त्यांनी कोर्टात धाव घेतली. मात्र, स्टे मिळण्यापूर्वीच आम्ही तोडक कारवाई पूर्ण केल्याने मेट्रो प्रकल्पातील अडथळा हटविण्यात आम्हाला यश मिळाले.

पृथ्वीराज चव्हाण, सहायक आयुक्त, के/पश्चिम विभाग

फोटो - व्यायामशाळेवर तोडक कारवाई करताना पालिका के/पश्चिम विभाग.

Web Title: Municipal hammer on the 'gymnasium' which is an obstacle in the way of Metro

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.