Join us
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेतील अभियंत्याने साकार केली गणेशा सांस्कृतिक कलाकृती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2020 18:43 IST

गणपती बाप्पासाठी सांस्कृतीची निर्मिती

मनोहर कुंभेजकर

मुंबई : गणपती म्हणजे संपूर्ण भारताचे आराध्य दैवत. प्रख्यात विदेशी ट्यून "टकीला"चा बेमालूम वापर करून भारतातील आठ प्रांतातील विविध वाद्य व न्यृत्य याचा वापर करून गणपती बाप्पासाठी उच्च दर्जाच्या सांस्कृतीची निर्मिती केली आहे. त्यासाठी  ग्रामीण ढोल ताशा ( लेझीम )व लावणी ( महाराष्ट्र), घुमूर ( राजस्थान ) , गरबा ( गुजराथ), कव्वाली ( लखनौ ), कथ्थक व कुचिपूडी (केरळ ), भांगडा( पंजाब) व कार्निव्हल (वेस्टर्न कल्चर - गोवा ) या सर्व स्टाईलचा उत्तमपणे वापर केला आहे. या सर्व कलाकृतीचे नाव "गणेशा" असे ठेवले असल्याची माहिती मुंबई महापालिकेचे उपमुख्य अभियंता संजय महाले यांनी लोकमतला दिली. "गणेशा" या सांस्कृतीक कलाकृतीची संकल्पना, दिग्दर्शन, गायन व निर्देशन त्यांनी केले आहे.

महापालिकेतील अभियंत्याच्या सांस्कृतिक कलाकृतीला सध्या सोशल मीडियावर उत्तम दाद मिळत आहे. मुंबई महानगर पालिकेच्या वॉर रूमच्या कार्यप्रणालीवर एक शॉर्टफिल्म तयार केली असून त्याला सर्व स्तरावर उत्तम दाद मिळाली आहे. संजय महाले हे मुंबई महानगर पालिकेत उपमुख्य अभियंता म्हणून कार्यरत असून त्यांना संगीताची विलक्षण आवड आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ते स्वतः उत्तम गझल व कविता करतात. ते लेखक व स्वतः दिग्दर्शक आहेत. सदर कलाकृतीत नृत्यंगना धनश्री दळवी, दीपिका, संध्या कामत व स्वतः संजय महाले यांचा समावेश आहे. तर पाहुणे कलाकार म्हणून तलत अजिज, सुदेश भोसले, वैशाली सामंत व वैशाली माडे यांचा देखिल सहभाग आहे. सदर कलाकृतीचे संगीत संयोजन प्रख्यात संगीतकार नितीन शंकर यांनी केले असून नृत्य दिग्दर्शन लॉलीपॉप यांनी केले आहे. 

टॅग्स :गणेशोत्सवमुंबई