महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी जोरात
By Admin | Updated: October 24, 2015 04:09 IST2015-10-24T04:09:12+5:302015-10-24T04:09:12+5:30
देशातील सर्वांत श्रीमंत महापालिका म्हणून ओळख असलेल्या मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना यंदाच्या दिवाळीसाठी तब्बल १३ हजार ५०० रुपये एवढा बोनस मंजूर झाला आहे.

महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी जोरात
मुंबई : देशातील सर्वांत श्रीमंत महापालिका म्हणून ओळख असलेल्या मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना यंदाच्या दिवाळीसाठी तब्बल १३ हजार ५०० रुपये एवढा बोनस मंजूर झाला आहे. ५ नोव्हेंबर रोजी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात बोनसची रक्कम जमा होईल. बोनसपोटी देण्यात येणाऱ्या रकमेमुळे महापालिकेवर अंदाजे १६९ कोटींचा आर्थिक बोजा पडणार आहे. मुंबई महापालिकेत एकूण १ लाख १७ हजार ५२९ कर्मचारी आहेत.
अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षकांना ६ हजार ७५०, कंत्राटी कामगारांना मागील वर्षाच्या वेतनावर ८.३३ टक्के बोनस तर आरोग्य सेविकांना भाऊबीज म्हणून ४ हजार रुपये एवढी रक्कम देण्यात येणार आहे.