ठाणे - ठाणे व कल्याण-डोंबिवली पालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक ३ फेब्रुवारीला होईल. जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ ठाण्यासाठी, तर कल्याण-डोंबिवलीसाठी मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल पीठासीन अधिकारी असतील, अशी माहिती कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी दिली. शिंदेसेना व भाजपमध्येच येथे रस्सीखेच आहे.
ठाण्यात महापौरपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित आहे. शिंदेसेनेचे ७५ नगरसेवक निवडून आले. बहुमताचा आकडा ६६ आहे. भाजपचे २८ नगरसेवक निवडून आले. शिंदेसेनेचे पद्मा भगत, वनिता घोगरे, विमल भोईर, गणेश कांबळे, डॉ. दर्शना जानकर, आरती गायकवाड आणि दीपक जाधव हे अनुसूचित जाती प्रवर्गातील आहेत.
ठाण्यातील पक्षीय बलाबलशिंदेसेना: ७५भाजप: २८राष्ट्रवादी (शप): १२राष्ट्रवादी (अप): ९एमआयएम: ५अपक्ष: ०
उल्हासनगरला पुढच्या आठवड्यात निर्णयउल्हासनगर महापौर व उपमहापौर निवडीबाबत कोकण विभागीय आयुक्तांना सोमवारी किंवा मंगळवारी पत्र देणार असल्याचे पालिका उपायुक्त अनंत जवादवार यांनी सांगितले. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात निवड प्रक्रिया होईल, असे संकेत त्यांनी दिले. सत्तेसाठी ४० मॅजिक फिगर आहे.
पक्षीय बलाबलभाजप ३७शिंदेसेना ३६काँग्रेस १वंचित २साई पक्ष १अपक्ष १
भिवंडीत गट स्थापनेनंतर निवडणूकभिवंडीत सर्व पक्षांचे गटनेते निवडल्यानंतर कोकण विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून महापौर, उपमहापौर निवडणुकीसाठी तारीख देण्याची विनंती करण्यात येईल, असे निवडणूक विभागाने सांगितले. भिवंडीत काँग्रेस (३०), राष्ट्रवादी (शरद पवार) (१२) व सप (६) यांनी एकत्र येत भिवंडी सेक्युलर फ्रंटची स्थापना केली आहे. बहुमतासाठी ४६ नगरसेवकांची आवश्यकता आहे. भाजपचे २२, शिंदेसेनेचे १२, कोणार्क विकास आघाडीचे ४, भिवंडी विकास आघाडीचे ३ आणि एक अपक्ष निवडून आला आहे.
कल्याण-डोंबिवलीत अडीच वर्षांचा कार्यकाळमहापौर व उपमहापौरपदासाठी अडीच वर्षांचा कालावधी निश्चित असेल. ३ फेब्रुवारीला दुपारी निवडणूक होईल. २९ व ३० जानेवारीला सकाळी ११ ते संध्याकाळी ५:३० पर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करायचे आहेत. महापौरपद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहे. उद्धवसेनेचे चार नगरसेवक नॉटरीचेबल असून २ शिंदेसेनेच्या तर २ मनसेच्या संपर्कात आहेत. उद्धवसेनेने ७ नगरसेवकांच्या गटाची नोंदणी केली. शिंदेसेनेचे किरण भांगले, हर्षली थवील, तर मनसेच्या शीतल मंदारी अनुसूचित जमाती प्रवर्गातून निवडून आल्या आहेत. बहुमताचा आकडा ६२ आहे.
पक्षीय बलाबलशिंदेसेना ५३भाजप ५०उद्धवसेना ११मनसे ५काँग्रेस २राष्ट्रवादी (शरद पवार) १
मिरा-भाईंदरमध्ये होणार भाजपचा महापौर, उपमहापौर; ३ फेब्रु.ला निवड मिरा रोड : मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महापौरपदासह उपमहापौरपदाची निवडणूक ३ फेब्रुवारी रोजी होणार असून ३० जानेवारी रोजी या दोन्ही पदांसाठी उमेदवारी अर्ज भरले जाणार आहेत.
मिरा-भाईंदर महापालिकेत ९५ पैकी ७८ जागा भाजपने जिंकल्या आहेत. तर कोकण विभागीय आयुक्तांकडे नोंदणी वेळी भाजपचे बंडखोर व अपक्ष म्हणून निवडून आलेले अनिल भोसले यांनीदेखील भाजपला समर्थन दिले. त्यामुळे भाजपचे संख्याबळ ७९ झाले आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे १३ व शिंदेसेनेचे ३ नगरसेवक आहेत. त्यामुळे भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने महापौर आणि उपमहापौर हा भाजपचा होणार हे निश्चित आहे.
मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांची या विशेष सभेसाठी पीठासीन अधिकारीपदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे ३० जानेवारी रोजी महापालिका मुख्यालयात महापौर आणि उपमहापौरपदासाठी इच्छुकांचे उमेदवारी अर्ज सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत स्वीकारले जातील. आलेले अर्ज हे ३ फेब्रुवारीला विशेष सभेत महापालिका पीठासीन अधिकारी कटियार यांच्या समक्ष ठेवतील. सुरुवातीला महापौरपदासाठी निवडणूक होईल. अर्जांची छाननी पीठासीन अधिकारी करतील. त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा कालावधी दिला जाईल. जे उमेदवारी मागे घेतील त्यानंतर जर एकच उमेदवार असल्यास बिनविरोध होईल आणि जास्त उमेदवार असल्यास निवडणूक प्रक्रिया सुरू केली जाईल. तीच पद्धत उपमहापौरपदासाठी अवलंबली जाणार आहे. यंदाचे महापौरपद हे खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव असल्याने उपमहापौरपद पुरुष नगरसेवकाला दिले जाईल, अशी शक्यता आहे.
Web Summary : Maharashtra's municipal corporations gear up for mayoral elections. Thane and Kalyan-Dombivli will elect their mayors on February 3rd. Mira-Bhayandar likely to see a BJP mayor due to their majority. Ulhasnagar and Bhiwandi elections are upcoming.
Web Summary : महाराष्ट्र के नगर निगमों में महापौर चुनाव की तैयारी। ठाणे और कल्याण-डोंबिवली में 3 फरवरी को महापौर चुने जाएंगे। मीरा-भायंदर में भाजपा का महापौर बनना तय है। उल्हासनगर और भिवंडी में चुनाव जल्द होंगे।