Join us  

कर्ज फेडण्यासाठी महापालिका बेस्टला देणार १२०० कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2019 3:10 AM

बिनव्याजी कर्ज : सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत एकमताने मंजुरी

मुंबई : आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाला महापालिकेकडून आणखी १२०० कोटींचे कर्ज मिळणार आहे. विविध बँकांकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी ही रक्कम देण्यात येणार आहे. मात्र हे कर्ज बिनव्याजी असल्याने बेस्टला मोठा दिलासा मिळणार आहे. या प्रस्तावाला सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत एकमताने मंजुरी देण्यात आली आहे.

पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेताच बेस्ट उपक्रमाला मदत करण्याची तयारी दाखवली. त्यानुसार दरमहा शंभर कोटी रुपये आर्थिक साहाय्य देण्याचा निर्णय गटनेत्यांच्या बैठकीत झाला. मात्र पालिका प्रशासनाने प्रत्यक्षात सहाशे कोटी रुपये मंजूर केले. बेस्ट उपक्रमावर विविध बँकांचे सुमारे दोन हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमाला या कर्जावरील व्याजापोटी वार्षिक दोनशे कोटी रुपये जमा करावे लागत आहेत. या कर्जातून बेस्ट उपक्रमाची सुटका झाल्यास नवीन बस खरेदी, नव्या योजना, कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत काढणे शक्य होईल. म्हणूनच, बेस्टला १६०० कोटी रुपये कर्ज देण्याची मागणी केली जात होती. पालिका प्रशासनाने १२०० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. ही रक्कम विविध बँकांमधील आपले थकीत कर्ज फेडण्यासाठी बेस्ट उपक्रमाला वापरता येणार आहे. त्यामुळे खºया अर्थाने आता ‘बेस्ट’ दिवस येणार आहेत.नव्याने दिलेल्या कर्जाचा वापर कर्ज फेडण्यासाठीच्उत्पन्नापेक्षा खर्च अधिक असल्याने बेस्ट उपक्रमाला आपले दैनंदिन खर्च भागविण्यासाठी कर्ज घ्यावे लागले. कामगारांचे वेतन देणेही अवघड झाले होते. अशाने कर्ज वाढत गेले असून बेस्ट उपक्रमावर सध्या दोन हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे.च्२०११ मध्ये महापालिकेने बेस्ट उपक्रमाला १६०० कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. मात्र १० टक्के व्याजाने हे कर्ज दिल्यामुळे ते फेडताना बेस्ट उपक्रमाने नवीन कर्ज घेतले. या कर्जावरील व्याज माफ करण्याची मागणी अनेकवेळा नगरसेवकांनी केली होती. मात्र आता पालिकेने १२०० कोटींचे बिनव्याजी कर्ज मंजूर केले आहे. मात्र ही रक्कम कर्ज फेडण्यासाठीच वापरता येणार आहे.च्महापालिकेच्या अटीनुसार बेस्ट उपक्रमाने ९ जुलैपासून प्रवासीभाड्यात कपात केली आहे. त्यानुसार किमान पाच रुपये ते २० रुपये प्रवासी भाडे सध्या आकारण्यात येत आहे. मात्र भाडेकपातीमुळे प्रवाशांची संख्या दहा लाखांनी वाढली आहे. बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात सुमारे तीन हजार बसगाड्या वाढणार आहेत.

टॅग्स :बेस्टमुंबई