पालिकेतील पदे रिक्त!
By Admin | Updated: December 15, 2014 00:56 IST2014-12-15T00:56:21+5:302014-12-15T00:56:21+5:30
मुंबई महानगरपालिकेतील रिक्त पदे ही सरळ सेवा भरती आणि पदोन्नतीद्वारे भरूनही मागासवर्गीयांची विविध संवर्गातील ४ हजार ११५ पदे रिक्त आहेत.

पालिकेतील पदे रिक्त!
मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील रिक्त पदे ही सरळ सेवा भरती आणि पदोन्नतीद्वारे भरूनही मागासवर्गीयांची विविध संवर्गातील ४ हजार ११५ पदे रिक्त आहेत. यासंदर्भातील माहिती विधी समितीने मागतिली होती. याबाबतचा ताळेबंद प्रशासनाने तयार केला आहे. तो लवकच विधी समितीसमोर मांडण्यात येणार आहे.
महानगरपालिकेने ३१ डिसेंबर २०१३ सालापर्यंत सरळ सेवा भरतीच्या माध्यमातून रिक्त भरली. मात्र या भरतीत ५२ टक्के आरक्षणानुसार विविध संवर्गसाठी ३५ हजार ३८१ पदे राखीव होती. विविध संवगार्तील ३२ हजार ५४९ पदांवर मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. सरळ सेवा भरतीमध्ये आरक्षित पदांपैकी २ हजार ८३२ पदांचा अनुशेष भरावयाचा आहे. शिवाय पदोन्नतीद्वारे विविध संवर्गातील आरक्षित पदे भरण्यात आली. मात्र ३३ टक्के आरक्षणानुसार ५ हजार ४४५ आरक्षित पदे भरावयाची होती. परंतु त्यापैकी ४ हजार १६२ पदे पदोन्नतीद्वारे भरण्यात आली. मात्र १ हजार २८३ पदे भरावयाची आहेत.