महापालिकेने केली ७१६ प्रार्थनास्थळांची वर्गवारी
By Admin | Updated: May 9, 2015 23:11 IST2015-05-09T23:11:06+5:302015-05-09T23:11:06+5:30
सर्वोच्च न्यायालयाने २९ सप्टेंबर २००९ नंतरच्या सर्व प्रार्थनास्थळांची वर्गवारी करून ती तोडण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, ठाणे महापालिकेने शहरातील

महापालिकेने केली ७१६ प्रार्थनास्थळांची वर्गवारी
अजित मांडके, ठाणे
सर्वोच्च न्यायालयाने २९ सप्टेंबर २००९ नंतरच्या सर्व प्रार्थनास्थळांची वर्गवारी करून ती तोडण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, ठाणे महापालिकेने शहरातील ७१६ प्रार्थनास्थळांची यादी जाहीर केली असून त्यांची अ, ब आणि क अशी वर्गवारी केली आहे. विशेष म्हणजे २००९ नंतरच्या दोन प्रार्थनास्थळांवर कारवाई करण्यात आल्याचा दावा करण्यात आला असून त्यानंतर एकही प्रार्थनास्थळ उभारले गेले नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. या सर्व प्रार्थनास्थळांचा निर्णय नेमण्यात आलेल्या समित्या घेणार आहेत.
ठाणे महापालिका हद्दीत आजघडीला शासकीय आणि सार्वजनिक जागांवर ७१६ विविध धर्मांची प्रार्थनास्थळे आहेत. महापालिकेने त्यांची प्रभाग समितीनिहाय एक यादी तयार केली आहे.
यामध्ये सर्वाधिक अनधिकृत प्रार्थनास्थळे रालयादेवी प्रभाग समितीत १३९ आहेत. त्यानंतर, माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीत ११३, मुंब्य्रात १०९, कळवा १०५, वर्तकनगर ७५, वागळेत ७३, नौपाडा ३७, कोपरी ३६ आणि उथळसर येथे ३२ अशी एकूण ७१९ सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे आहेत.
त्यातही सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार २९ सप्टेंबर २००९ नंतरची सर्व अनधिकृत प्रार्थनास्थळांची बांधकामे निष्कासित करण्यापूर्वी त्यांची अ, ब आणि क मध्ये वर्गवारी करावी, असे स्पष्ट केले आहे. नंतर, ही वर्गवारी नियुक्त केलेल्या समितीला सादर करायची आहे.