महापालिकेचा कारभार अॅपवर!

By Admin | Updated: July 27, 2014 00:57 IST2014-07-27T00:57:30+5:302014-07-27T00:57:30+5:30

एका क्लिकवर आता कोणत्याही गोष्टीची सहज खरेदी-विक्री करू शकतो, स्मार्टफोन्समुळे तर या गोष्टी आता अजूनच सोप्या झाल्या आहेत.

Municipal corporation is on the app! | महापालिकेचा कारभार अॅपवर!

महापालिकेचा कारभार अॅपवर!

मुंबई : एका क्लिकवर आता कोणत्याही गोष्टीची सहज खरेदी-विक्री करू शकतो, स्मार्टफोन्समुळे तर या गोष्टी आता अजूनच सोप्या झाल्या आहेत. प्रवास करतानादेखील बिल भरणो, खरेदी - विक्री या सर्व गोष्टी सहजपणो करता येतात. इंटरनेटमुळे आता रांगा लावण्याची पद्धतही मागे पडताना दिसत आहे. धावपळ, धकाधकीच्या या जीवनात सगळ्यांनाच या गोष्टी अंगवळणी पडलेल्या आहेत. नवनवीन उपक्रम राबवणारी मुंबई महापालिकेची कामेदेखील आता सामान्य जनतेला एका क्लिकवर करता येणार आहेत. कारण पुढच्या आठवडय़ात मुंबई महापालिका एक नवीन अॅप सुरू करणार आहे. 
एमसीजीएम 24 बाय 7 हे अॅप्लिकेशन पुढच्या आठवडय़ामध्ये मुंबईकरांसाठी खुले करण्यात येणार आहे. प्ले स्टोरमध्ये हे अॅप्लिकेशन मोफत उपलब्ध असणार आहे. सामान्य मुंबईकरांना महापालिकेची अनेक कामे करण्यासाठी अजूनही रांगा लावायला लागतात, तक्रार करण्यासाठी पत्र लिहावी लागतात, काही काम राहिल्यास अनेकदा खेटे घालावे लागतात. एकूणच सगळ्या धकाधकीच्या जीवनामध्ये हे करताना, मुंबईकरांची दमछाक होते. या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच महापालिकेने हे अॅप्लिकेशन तयार केले आहे.
एमसीजीएम 24 बाय 7 हे मोबाइल अॅप्लिकेशन अँड्राईड ऑपरेटिंग सिस्टीम असणा:या मोबाइलमध्ये इन्स्टॉल केल्यावर अॅप्लिकेशनचे आयकॉन म्हणून महापालिकेचे बोधचिन्ह मोबाइल स्क्रीनवर दिसणार आहे. (प्रतिनिधी)  
 
या अॅप्लिकेशनवर सीसीएन क्रमांक नोंदवून देय असलेली रक्कम पाहता येऊ शकते. याचबरोबरीने ऑनलाइन पेमेंटचे विविध पर्याय वापरून रकमेचा भरणा करता येऊ शकतो. महापालिकेचे कोणतेही बिल या अॅपवरून भरता येणार आहे. 
 
बिल भरल्यावर त्याची पोचपावती लघुसंदेशाद्वारे त्वरित मिळणार आहे. त्याचबरोबरीने आवश्यकतेनुसार ऑनलाइन पेमेंटची पावतीदेखील प्राप्त करता येऊ शकणार आहे. या अॅपवर तक्रार करण्यासाठीदेखील एक पर्याय देण्यात आला आहे. 

 

Web Title: Municipal corporation is on the app!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.