कोरोना रोखण्यासाठी आता बांधकाम साईटवरील मजुरांवर महापालिकेचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 04:48 PM2020-09-03T16:48:41+5:302020-09-03T16:49:55+5:30

शहरातील विविध ठिकाणाच्या बांधकाम साईटवर आता महापालिकेने आपले लक्ष केंद्रीत करण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार या ठिकाणी काम करणाºया कामगारांच्या अ‍ॅन्टीझेम टेस्ट करण्यावर भर दिला जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

Municipal attention now on construction site workers to prevent corona | कोरोना रोखण्यासाठी आता बांधकाम साईटवरील मजुरांवर महापालिकेचे लक्ष

कोरोना रोखण्यासाठी आता बांधकाम साईटवरील मजुरांवर महापालिकेचे लक्ष

Next

ठाणे : तिनहात नाका परिसरातील एका बांधकाम साईडवर ३७ कोरोना बाधीत रुग्ण आढळल्यानंतर आता ठाणे महापालिकेने शहरातील विविध ठिकाणी सुरु असलेल्या बांधकाम साईडवर लक्षकेंद्रीत करण्याचे निश्चित केले आहे. या ठिकाणी असलेल्या मजुरांच्या अ‍ॅन्टीझन चाचण्या करण्यावर भर दिला जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
       ठाणे शहरात मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाने शिरकाव केला. त्यात एप्रिल महिन्यापासून दिवसेंदिवस शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून आले. मे, जून, जुलै आणि आॅगस्ट महिन्यात बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत गेली आहे. सध्या शहरात बाधित रु ग्णांची संख्या २६ हजार ४०६ इतकी असून ८५१ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर एक हजार ९५७ रु ग्ण उपचारार्थ दाखल असल्याची नोंद करण्यात आली आहे. कोरोनाचा हा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून शहरातील झोपडपट्टी भागात निर्जंतुकीकरण करण्यात आले असून धूर फवारणी करण्यावर भर देण्यात आला होता. मात्र, तरी देखील शहरात बाधितांच्या संख्येत घट होत नसल्याचे दिसून येत होते. त्यात मागील काही महिन्यापूर्वी शहरात विविध ठिकाणी सुरु असलेल्या बांधकाम साईटवरील ५५० मजुरांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यावेळी ८२ मजुरांना लागण झाली असल्याचे आढळून आले होते. तर ठाणे जिल्हाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाका कामगार, घरकाम करणाऱ्या महिलांच्या अ‍ॅन्टीझेन चाचण्या करण्याच्या सूचना महापालिकेला केल्या होत्या. त्यानुसार ठाण्यातील तीनहात नका परिसरात सुरु असलेल्या बांधकाम साईटवरील ८० मजुरांच्या अ‍ॅन्टीझेन चाचण्या करण्यात आल्या असता, ३७ मजुरांना लागण झाल्याचे आढळून आले. मात्र, या मजुरांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याने त्यांना भार्इंदर पाडा येथे विलागीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे. दरम्यान, शहरात बांधकाम सुरु असलेल्या साईटवर मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित मजूर आढळून येत असल्यामुळे आता, ठाणे महापालिकेने शहरातील बांधकाम सुरु असलेल्या साईटवरील मजुरांचे अ‍ॅन्टीझेन चाचण्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. अ‍ॅन्टीझेन चाचण्या वाढविल्यास त्यामुळे बाधित रु ग्णांची तत्काळ माहिती मिळत असून सदर रुग्णांवर तत्काळ उपचार करणेही सोईचे झाले असल्याची माहिती उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली.
 

Web Title: Municipal attention now on construction site workers to prevent corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.