मुंडे विरुद्ध मुंडे
By Admin | Updated: March 24, 2015 01:40 IST2015-03-24T01:40:59+5:302015-03-24T01:40:59+5:30
धनंजय मुंडे हे विरोधी पक्षनेते होऊनही अजून त्यांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना लक्ष्य कसे केले नाही याचे औत्सुक्य होते.
मुंडे विरुद्ध मुंडे
धनंजय मुंडे हे विरोधी पक्षनेते होऊनही अजून त्यांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना लक्ष्य कसे केले नाही याचे औत्सुक्य होते. अर्थसंकल्पावर बोलताना ग्रामविकास विभागाने ३ लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेची कामे ई-टेंडरिंग करण्याच्या निर्णयाला बगल देऊन कशी २ लाख ९९ हजार रुपयांची हजारो कामे दिली त्याचा तपशील देत राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारच्या पारदर्शक कारभाराचा बुरखा फाडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सभागृह नेते एकनाथ खडसे यांनी धनंजय विरोधी पक्षनेते झाले तेव्हा त्यांच्याशी भाजपात असताना आपले कसे जिव्हाळ्याचे संबंध होते ते स्पष्ट केले होते. त्यामुळे धनंजय यांचे लक्ष्य मुख्यमंत्री नसून पंकजा आहे हे उघड आहे. पंकजा यांच्या रोखाने चाप ओढताना स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाकरिता १ रुपया तरतूद केली नाही हे सांगत मुंडे समर्थकांची सहानुभूती मिळवण्याचा खुबीने प्रयत्न केला. महाराष्ट्राच्या राजकारणातील मुंडे विरुद्ध मुंडे संघर्षात तलवारीला तलवार भिडलीच...
- संदीप प्रधान