Join us  

मुंबईवरील पाणीकपात लवकरच होणार रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 1:27 AM

तलावांमध्ये सतत पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे पाण्याची पातळी सतत वाढत असून तलावांमध्ये ४८ टक्के जलसाठा जमा झाला आहे.

मुंबई : तलावांमध्ये सतत पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे पाण्याची पातळी सतत वाढत असून तलावांमध्ये ४८ टक्के जलसाठा जमा झाला आहे. त्यामुळे गेले आठ महिने मुंबईत सुरू असलेली दहा टक्के पाणीकपात लवकरच रद्द होणार आहे.मुंबईला वर्षभर पाणीपुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा असणे आवश्यक आहे. मात्र गेल्या वर्षी नऊ टक्के जलसाठा कमी असल्याने मुंबईत १५ नोव्हेंबर २०१८ पासून सरसकट दहा टक्के पाणीकपात लागू करण्यात आली होती. गेले आठ महिने मुंबईकरांना पाण्यासाठी वणवण करावी लागली. मात्र जुलै महिन्यात पावसाने तलाव क्षेत्रात चांगला जोर धरल्याने तलावांची पातळी झटपट वाढली आहे. तलावांमध्ये आता जवळपास ५० टक्के जलसाठा जमा झाला आहे. त्यामुळे पाणीकपात लवकरच मागे घेतल्याचे पालिका प्रशासन जाहीर करणार आहे.>१५ जुलै २०१९ (दशलक्ष लीटर्स)तलाव शिल्लक २४ तासांतीलजलसाठा पाऊस (मिमी)अप्पर ० १०वैतरणामोडक सागर ११०२०६ १७तानसा ११०१४६ ११मध्य वैतरणा १३२८७६ ११भातसा ३२०६४९ ०८विहार १५८३७ ०तुळशी ८०४६ २

टॅग्स :पाणीटंचाई