मुंबईच्या तापमानात वाढ होणार, विदर्भात दोन दिवस गारवा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:27 IST2021-02-05T04:27:31+5:302021-02-05T04:27:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईच्या किमान तापमानात घसरण हाेऊन मुंबईकरांना गारठा जाणवू लागला असला तरी ताे फार काळ ...

मुंबईच्या तापमानात वाढ होणार, विदर्भात दोन दिवस गारवा कायम
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईच्या किमान तापमानात घसरण हाेऊन मुंबईकरांना गारठा जाणवू लागला असला तरी ताे फार काळ टिकणार नाही. कारण मुंबईच्या किमान तापमानात हळूहळू वाढ नोंदविण्यात येईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. दुसरीकडे विदर्भात मात्र आणखी दोन दिवस गारवा कायम राहील, अशीही शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, उत्तर मध्य महाराष्ट्रात किमान तापमानाचा पारा खाली आहे. उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत येथील किमान तापमानात चांगली घट नोंदविण्यात येत आहे. विदर्भातही किमान तापमानात घट नोंदविण्यात आली आहे. किमान तापमानात घट होण्याचा ट्रेंड पुढील २४ तास कायम राहणार असला तरी रविवारनंतर किमान तापमानात वाढ नोंदविण्यात येईल. तर पुढील काही दिवसांत हवामानात बदल होतील. परिणामी मध्य भारतात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या किमान तापमानात घट नोंदविण्यात येत आहे. हे किमान तापमान थेट १४ अंशावर खाली उतरले. शनिवारी मुंबईचे किमान तापमान १६ अंश नोंदविण्यात आले असून, उत्तरोत्तर यात वाढ नोंदविण्यात येणार आहे.
........................