Join us  

आला उन्हाळा! मुंबईचा पारा ३७ अंशावर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 3:01 AM

दररोजच्या तुलनेत रविवारचा सूर्य अधिकच तळपत असल्याची प्रचिती मुंबईकरांना आली. आता कमाल तापमानाचा पारा चढाच राहणार असून, १६ मार्चपासून यात आणखी वाढ होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

मुंबई : भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, मुंबईच्या कमाल तापमानात आता वाढ होऊ लागली आहे. रविवारी मुंबईचे कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. विशेषत: दररोजच्या तुलनेत रविवारचा सूर्य अधिकच तळपत असल्याची प्रचिती मुंबईकरांना आली. आता कमाल तापमानाचा पारा चढाच राहणार असून, १६ मार्चपासून यात आणखी वाढ होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.राज्याचा विचार करता, येत्या २४ ते २८ तासांत उत्तर कोकणासह मुंबईचे कमाल तापमान ३६ ते ३८ अंशांच्या घरात नोंदविण्यात येईल. कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रातील कमाल तापमान ३८ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येईल. या शिवाय संपूर्ण राज्यभरातील कमाल तापमान येत्या ४८ तासांत नोंदविण्यात येईल, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. दरम्यान, अचानकरीत्या तापमानात नोंद होत असून, उन्हाचा चटका वाढत आहे. गेल्या २४ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याच्या कमाल तापमानात घट नोंदविण्यात आली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भाच्या किमान तापमानात घट झाली आहे.राज्यासाठी अंदाज१६, १७ आणि १८ मार्च : विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस पडेल. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे राहील.१९ मार्च : विदर्भात पाऊस पडेल.मुंबई अंदाज१६ आणि १७ मार्च : मुंबई आणि आसपासच्या परिसरात आकाश मुख्यत: निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३६, २० अंशांच्या आसपास राहील. 

टॅग्स :तापमानहवामानमुंबई