मुंबईचे तापमान १९ अंशावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2015 02:51 IST2015-11-30T02:51:12+5:302015-11-30T02:51:12+5:30
अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र विरल्यानंतर हवामानात उल्लेखनीय बदल होऊ लागले आहेत. मुंबईचे किमान तापमान १९ अंशावर घसरले असून, गारव्यात किंचितशी वाढ झाली आहे.

मुंबईचे तापमान १९ अंशावर!
मुंबई : अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र विरल्यानंतर हवामानात उल्लेखनीय बदल होऊ लागले आहेत. मुंबईचे किमान तापमान १९ अंशावर घसरले असून, गारव्यात किंचितशी वाढ झाली आहे.
पाऊस आणि हवामानातील बदलामुळे मुंबईच्या तापमानात चढ-उतार नोंदविण्यात आले होते. आर्द्रता व ढगाळ हवामानामुळे उकाड्यातही वाढ झाली होती. मात्र, आता तापमानात घसरण झाली असून, कमाल आणि किमान तापमान ३२, १९ अंशावर आले आहे. रात्रीच्या गारव्यात वाढ झाली आहे.
३० नोव्हेंबर ते २ डिसेंबरदरम्यान संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. ३ डिसेंबर रोजी राज्यात हवामान कोरडे राहील. तर पुढील ४८ तासांसाठी मुंबई आणि आसपासच्या परिसरात आकाश मुख्यत: निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३३, २२ अंशाच्या आसपास राहील, असा अंदाज आहे.