मुंबईच्या रस्त्यावरील गुन्हेगारी वाढली; दिवसाला ७ ते ९ वाहने चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:08 AM2021-09-21T04:08:26+5:302021-09-21T04:08:26+5:30

८ महिन्यात २ हजार १९९ वाहनांची चोरी, अवघ्या ९४० वाहनांचा शोध आठ महिन्यात दोन हजार १९९ वाहनांची चोरी; अवघ्या ...

Mumbai's street crime rises; 7 to 9 vehicles were stolen per day | मुंबईच्या रस्त्यावरील गुन्हेगारी वाढली; दिवसाला ७ ते ९ वाहने चोरीला

मुंबईच्या रस्त्यावरील गुन्हेगारी वाढली; दिवसाला ७ ते ९ वाहने चोरीला

Next

८ महिन्यात २ हजार १९९ वाहनांची चोरी, अवघ्या ९४० वाहनांचा शोध

आठ महिन्यात दोन हजार १९९ वाहनांची चोरी; अवघ्या ९४० वाहनांचा शोध

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात ‘लॉक’ झालेली रस्त्यावरील गुन्हेगारी पुन्हा ‘अनलॉक’ झाल्याने पोलिसांच्या डोकेदुखीत भर पडली आहे. गेल्या आठ महिन्यात मुंबईतून दोन हजार दोनशे वाहने चोरीला गेली आहेत. यातील अवघ्या ९४० वाहनांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. यात दिवसाला ७ ते ९ वाहने चोरीला जात आहेत.

गेल्या आठ महिन्यात मुंबईत एकूण ५२ हजार ५७९ गुन्हे नोंद झाले. लॉकडाऊनचे सुरुवातीचे मुख्यत्वेकरून एप्रिल आणि मे महिन्यात शहरातील गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात घट झाली. मात्र, गेल्यावर्षी जून महिन्यात अनलॉकचा टप्पा सुरू होताच जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये गुन्ह्यांचे प्रमाण पुन्हा जैसे थे स्वरूपात आले. यात वाहन चोरीत वाढ झाली आहे.

गेल्या आठ महिन्यात वाहन चोरीचे दोन हजार १९९ गुन्हे पोलीस दफ्तरी नोंद झाले आहे. यापैकी अवघ्या ९४० वाहनांचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात, ५९०ने वाढ झाली आहे. लॉकडाऊनच्या काळात यात वाढ झाली आहे. या वाहनांत दुचाकीचे प्रमाण अधिक आहे. दिवसाला ७ ते ९ वाहने चोरीला जात असल्याने मुंबईकरांच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे.

भंगारात पार्टची विक्री, तर कुठे बनावट क्रमांकाच्या आधारे विक्री

रस्त्यालगत उभ्या असलेल्या दुचाकी चोरून काही टोळी त्यांचे पार्टची मुंबईसह मुंबई बाहेर विक्री करतात. मुंबईतही बरेच गॅरेजमध्ये याची कमी भावात खरेदी करतात, तर काही जण त्यांना भंगारातील दुचाकींचे इंजिन नंबर लावत त्यांची विक्री करतात. भंगारामध्ये निघणाऱ्या दुचाकी दोन ते पाच हजारांमध्ये कागदपत्रांसह ग्राहकांकडून खरेदी करायचे. त्यानंतर त्याच बनावटीची दुचाकी शोधून त्या दुचाकीची चोरी करायचे, अशा टोळ्यांवर मुंबई पोलिसांकड़ून वेळोवेळी कारवाई करण्यात येत आहे तर काही ठग या बनावट क्रमांक लावून या दुचाकीची सोशल मीडियावरदेखील विक्री करताना दिसून आले.

९४० गुह्यांची उकल

मुंबईत आतापर्यंत दाखल वाहन चोरीच्या घटनांपैकी ९४० गुह्यांची उकल करण्यास पोलिसांना यश आले आहे. यात आतापर्यंत वेगवेगळ्या टोळ्यांंची, चोरांची पोलिसांनी धरपकड सुरू आहे.

नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

रस्त्यावरील गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांकड़ून गस्त वाढविण्यात आली आहे. तसेच सर्व आस्थापनाबाहेर सीसीटीव्ही लावण्याचे आदेश पोलिसांकडून देण्यात आले आहे. जेणेकरून गुन्ह्यांची उकल होण्यास मदत होईल. तसेच नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन मुंबई पोलिसांकड़ून करण्यात येत आहे.

Web Title: Mumbai's street crime rises; 7 to 9 vehicles were stolen per day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.