लोकमतच्या महारक्तदान चळवळीत महामुंबईचा उत्स्फूर्त सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:06 IST2021-07-23T04:06:11+5:302021-07-23T04:06:11+5:30
मुंबई : कोरोनाच्या काळात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून अशा संकटात ‘लोकमत’ ने सामाजिक बांधिलकी जोपासत रक्तदान महायज्ञाची चळवळ ...

लोकमतच्या महारक्तदान चळवळीत महामुंबईचा उत्स्फूर्त सहभाग
मुंबई : कोरोनाच्या काळात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून अशा संकटात ‘लोकमत’ ने सामाजिक बांधिलकी जोपासत रक्तदान महायज्ञाची चळवळ सुरू केली. रक्तदान हेच श्रेष्ठदान असे म्हणत महामुंबईतून हजारो रक्तदाते या रक्तदान शिबिरात सहभागी होत आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सरकारने सर्व राज्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
येत्या काळात रक्ताअभावी कोणत्याही रुग्णाला उपचारात अडचण येऊ नये यासाठी स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. लोकमतच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या रक्तदान शिबिराला महामुंबईतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. देशभरातून कौतुक होत आहे. ‘नातं रक्ताचं नातं जिव्हाळ्याचं’ या मोहिमेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.
रक्तदान शिबिराची ठिकाणे
तारीख /उपनगर/ सहयोगी संस्था / पत्ता / वेळ
२३ जुलै - बदलापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी बदलापूर शहर कॅप्टन आशिष दामले शहराध्यक्ष ,गटनेता बदलापूर / गणेश व्यापारी संकुल, बस डेपोजवळ, बदलापूर पश्चिम / ९ ते २:३०
----------------------
२४ जुलै - चेंबूर : रोटरॅक्ट क्लब ऑफ देवनार / जनरल एज्युकेशन अकॅडमी, मार्ग क्रमांक १९ चेंबूर गावठाण / १० ते ४
२४ जुलै - परळ : नॅशनल रेल्वे मजदूर युनियन (एनआरएमयू) / सेंट्रल रेल्वे लोको वर्कशॉप परळ १२, डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्ग परळ / १० ते ४
२४ जुलै - पालघर : कच्छ युवक संघ - पालघर शाखा / जिल्हा परिषद शाळा, बहाड, पोफरान, बोईसर, डहाणू / १० ते ५
२४ जुलै - खासदार गोपाळ शेट्टी भारतीय जनता पार्टी उत्तर मुंबई / सायली स्कूल अँड कॉलेज, एमएचबी कॉलनी, गोराई मार्ग, बोरिवली पश्चिम / ९ ते २
---------------
२५ जुलै - मालाड पूर्व : मनोहर राणे शाखाप्रमुख शिवसेना शाखा क्रमांक ३७ / जिजामाता विद्यामंदिर आनंदवाडी समोर कुरार गाव, मालाड पूर्व / ९ ते ३
२५ जुलै - विक्रोळी पश्चिम : कच्छ युवक संघ घाटकोपर शाखा / श्री केवीओ सेवा समाज हॉल, संभवनाथ जैन देरासर, ट्वीन हाऊस कॉलनी, फायर ब्रिगेड जवळ पार्क साईट विक्रोळी पश्चिम / ९ ते ४
२५ जुलै - केळवा : कच्छ युवक संघ - पालघर शाखा / भाजी मार्केट, केळवा / ९ ते ३
२५ जुलै - पालघर : कच्छ युवक संघ - पालघर / भाजी मार्केट, माहीम / ९ ते ३
२५ जुलै - विरार : कच्छ युवक संघ - विरार शाखा / पहिला मजला राम मंदिर, एम बी इस्टेट विरार पश्चिम / ९:३० ते ४:३० २५ जुलै - कोपर खैरणे : कच्छ युवक संघ - नवी मुंबई शाखा / श्री रामदास पावले कार्यालय, सेक्टर १० श्री लोहाना समाज हॉल जवळ, कोपर खैरणे / १० ते ४
२५ जुलै - ठाणे पश्चिम : ठाणे शहर काँग्रेस कमिटी / अय्यप्पा भक्त सेवा समिती हॉल, वर्तक नगर ठाणे पश्चिम / १० ते ४
------------
२७ जुलै - भांडुप पश्चिम : पराग सुभाष बने (उपविभाग प्रमुख भांडुप शिवसेना) व मित्रपरिवार / पराग शैक्षणिक संकुल, भांडुप पश्चिम १० ते ५
येथे संपर्क साधा
‘लोकमत’च्या रक्तदानाच्या महायज्ञात सहभागी होणाऱ्या संस्था किंवा संघटनांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आदी मुंबई महानगर प्रदेशात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यासाठी रोनाल्ड डिसोझा यांना ९०८२९९६५८३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
या संकेतस्थळावर नोंदणी करा
http://bit.ly/lokmatblooddonation
-------------------------------------