Join us

मुंबईतील रस्त्यांचा फॉर्म्युला ठरला हिट; पालिकेच्या कार्यकारी अभियंत्याचं भन्नाट तंत्रज्ञान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 08:57 IST

पालिकेचे कार्यकारी अभियंता डाॅ. विशाल ठोंबरे यांनी हे तंत्रज्ञान विकसित केले आहे.

मुंबई : मुंबई महापालिकेच्या अभियंत्याने विकसित केलेले अल्ट्रा थिन व्हाइट टॉपिंग हे तंत्रज्ञान देशात अव्वल ठरले आहे. हे तंत्रज्ञान प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेसाठी वापरले जाणार आहे. यापूर्वी गुजरात, चन्नई व राजस्थान या राज्यांमध्येही हे तंत्रज्ञान वापरण्यात आले होते, तर आता बिहार आणि त्रिपुरा सरकारने याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी मुंबई पालिकेशी संपर्क साधला आहे.  

पालिकेचे कार्यकारी अभियंता डाॅ. विशाल ठोंबरे यांनी हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. यात रस्त्याचा पाया डांबरी रस्त्याप्रमाणे बनवता येतो, तसेच वरील भाग काँक्रीटचा असतो. आयआयटी मुंबईतून पीएच.डी. करीत असताना ठोंबरेंनी या तंत्रज्ञानावर शोध निबंध लिहिला. त्यानंतर पालिकेने या पद्धतीने रस्ते बनवणे सुरु केली.  

 

टॅग्स :मुंबई महानगरपालिका