मुंबईचा पारा चढला!
By Admin | Updated: March 7, 2015 01:26 IST2015-03-07T01:26:01+5:302015-03-07T01:26:01+5:30
अवकाळी पावसामुळे पडलेली थंडी वगळता महाराष्ट्रभरातून थंडी गायब झाली होती. मात्र धुळवडीच्या दिवसापासून मुंबईचे तापमान वाढले आहे.

मुंबईचा पारा चढला!
मुंबई : अवकाळी पावसामुळे पडलेली थंडी वगळता महाराष्ट्रभरातून थंडी गायब झाली होती. मात्र धुळवडीच्या दिवसापासून मुंबईचे तापमान वाढले आहे. मुंबईचे सरासरी कमाल तापमान ३१ अंशावर पोहचले असून, मुंबईकरांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागल्या.
होळीनंतर कडाक्याच्या ऊन्हाला सुरुवात होते. एप्रिल आणि मे महिन्यादरम्यान राज्य उन्हाने होरपळून निघते. शुक्रवारी मुंबईकरांना या ऊन्हाची अशीच काहीशी प्रचिती आली. सकाळी अकरा वाजेपर्यंत सूर्यकिरणे सौम्य होती. मात्र बारा वाजेनंतर त्यांची तीव्रता वाढू लागली. चार वाजेपर्यंत पडलेल्या ऊन्हाने मुंबईचे रस्ते तापले. वाहणारा वारा आणि कडकडीत ऊन यामुळे अशा वातावरणामुळे दूरवरच्या अंतरावर ‘मृगजळ’ निर्माण झाल्याचे मुंबईकरांना नजरेस आले. भविष्यात कमाल तापमान वाढ होणार असून पारा ३५ अंशाचा आकडा पार करेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
दरम्यान, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या
काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. कोकण-गोव्याच्या
काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. (प्रतिनिधी)
७ मार्च - मराठवाडयात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल.
८ मार्च - विदर्भात पुष्कळ ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाडयात काही ठिकाणी मध्य स्वरुपाचा पाऊस पडेल. कोकण-गोव्यात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल.
९ मार्च - मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. कोकण, गोव्यात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल.
१० मार्च - उत्तर मध्य महाराष्ट्र व मराठवाडयात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. कोकण, गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्र व विदर्भात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल.
८ मार्च - मध्य महाराष्ट्र व मराठवाडयात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडेल. विदर्भात पुष्कळ ठिकाणी गारांचा पाऊस पडेल.
९ मार्च - मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडेल.
१० मार्च - उत्तर मध्य महाराष्ट्र व मराठवाडयात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल.