Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईचे महापौर लीलावती रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2019 00:39 IST

मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना अचानक उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने, गुरुवारी रात्री त्यांना वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर सध्या स्थिर असल्याचे समजते.

मुंबई : मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना अचानक उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने, गुरुवारी रात्री त्यांना वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर सध्या स्थिर असल्याचे समजते.महाडेश्वर यांची काही वर्षांपूर्वी बायपास शस्त्रक्रिया झाली आहे. त्याचबरोबर, त्यांना उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास आहे. त्यामुळे त्यांना नियमित तपासणीसाठी रुग्णालयात जावे लागते. मात्र, गुरुवारी रात्री त्यांना उलट्याहोऊ लागल्या. काही वेळाने हात्रास अधिक वाढल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परळ येथील पालिकेच्या केईएम रुग्णालयातून त्यांना लीलावती रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या ते विश्रांती घेत असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

टॅग्स :मुंबई