Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईचे किमान तापमान घसरतेय; पारा २० अंशांवर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 04:56 IST

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार १५, १६ जानेवारी रोजी मुंबई व आसपासच्या परिसरातील आकाश अंशत: ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३१, २१ अंशाच्या आसपास राहील.

मुंबई : राज्यात मंगळवारी सर्वांत कमी किमान तापमान नागपूर आणि ब्रह्मपुरी येथे ९.४ तर मुंबईचे किमान तापमान २० अंश सेल्सिअस नोंद झाले असून, मुंबईच्या किमान तापमानात घट झाल्याचा दावा हवामान खात्याने केला आहे. तर सोमवारसह रविवारी मुंबईचे किमान तापमान २१ अंशाच्या आसपास नोंदविण्यात आले होते.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार १५, १६ जानेवारी रोजी मुंबई व आसपासच्या परिसरातील आकाश अंशत: ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३१, २१ अंशाच्या आसपास राहील.

गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे.