मुंबईतील उमेदवार ‘आदर्श’
By Admin | Updated: October 6, 2014 04:04 IST2014-10-06T04:04:32+5:302014-10-06T04:04:32+5:30
राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहिता जाहीर होऊन २४ दिवसांचा कालावधी उलटला आहे

मुंबईतील उमेदवार ‘आदर्श’
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहिता जाहीर होऊन २४ दिवसांचा कालावधी उलटला आहे. सर्वच पक्ष आणि उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू असताना एकमेकांवर विखारी टीका केली जात आहे. मात्र या सर्व वातावरणात आदर्श आचारसंहिता जपण्याचे काम मुंबईच्या उमेदवारांनी केले आहे.
गेल्या २४ दिवसांत मुंबई शहरातील एकाही उमेदवाराविरोधात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ दिवसांत मुंबई शहरातील १० विधानसभा मतदारसंघांत केवळ २ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. दोन्ही गुन्हे भायखळा विधानसभा मतदारसंघात दाखल झालेले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे हे दोन्ही ज्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर दाखल केले आहेत. दरम्यान, पहिला गुन्हा २४ सप्टेंबर रोजी एआयएमआयएम पक्षाचे आमदार आमिर इद्रीस अकबरूद्दीन ओवेसी यांच्याविरोधात दाखल करण्यात आला आहे. तर दुसरा गुन्हा शिवसेनेच्या गणेश महांगरे या शिवसैनिकाविरोधात नोंदवण्यात आला आहे.