Join us

मुंबईचे हृदय चेन्नईला; प्रत्यारोपण यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 05:13 IST

अवयवदानाविषयीच्या जनजागृतीचा सकारात्मक परिणाम नुकताच दिसून आला आहे. मुंबईच्या एका खासगी रुग्णालयातील रुग्णाचे हृदय पहिल्यांदाच राज्याबाहेर पाठवले

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अवयवदानाविषयीच्या जनजागृतीचा सकारात्मक परिणाम नुकताच दिसून आला आहे. मुंबईच्या एका खासगी रुग्णालयातील रुग्णाचे हृदय पहिल्यांदाच राज्याबाहेर पाठवले. हे हृदय प्रत्यारोपणासाठी चेन्नईला पाठविण्यात आले.रुग्णालयात उपचार घेणाºया ४३ वर्षीय व्यक्तीला ब्रेनडेड घोषित केल्यानंतर कुटुंबीयांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. पण त्याचे इतर अवयव दान करण्यासाठी सक्षम नव्हते. म्हणून त्यांनी हृदय दान करण्याचा निर्णय घेतला. मुंबईत योग्य रुग्ण नसल्याने थेट चेन्नईला हे हृदय पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘नॅशनल आॅर्गन अ‍ॅण्ड टिश्यू ट्रान्सप्लान्ट’ समितीच्या मध्यस्थीने चेन्नईतील रुग्णाला हृदय देण्याचा निर्णय घेण्यात आला. गुरुवारी दुपारी १२ वाजून ४८ मिनिटांनी ग्रीन कॉरिडोरच्या साहाय्याने हे हृदय १ वाजून २८ मिनिटांनी मुंबई विमानतळावर नेले. त्यानंतर ते चेन्नईतील रुग्णालयाकडे रवाना करण्यात आले.

 

टॅग्स :आरोग्यमुंबई