Join us
Daily Top 2Weekly Top 5

 फ्रान्स येथे झालेल्या वर्ल्ड टेबल टेनिस युथ कंटेंडर स्पर्धेत मुंबईच्या लेकिचे 'सोनेरी' यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 19:16 IST

 फ्रान्स येथे झालेल्या वर्ल्ड टेबल टेनिस युथ कंटेंडर स्पर्धेत मुंबईच्या दिव्यांशी भौमिकने सुवर्ण पदक जिंकले. 

विशाल हळदे ठाणे : श्री मावळी मंडळ ठाणे संस्थेत चालणाऱ्या ऍस टेबल टेनिस क्लबच्या कु. दिव्यांशी भौमिकने फ्रान्स येथे झालेल्या वर्ल्ड टेबल टेनिस युथ कंटेंडर स्पर्धेत १३ वर्षाखालील मुलींच्या गटात भारताचे प्रतिनिधित्व करीत सुवर्ण पदक कमाविले. ही स्पर्धा १७ एप्रिल ते २३ एप्रिल या कालावधीत पार पडली. दिव्यांशीने उझबेकिस्तानची कमलोवा अरुजन हिची ११-९, ११-३, ११-२, असा पराभव करून सुवर्ण पदकाची कमाई केली.

ह्या तिच्या प्रवासात राष्ट्रीय शिक्षक श्री.आकाश कासार ह्यांचे मोलाचे योगदान आहे. टेबल टेनिस खेळाच्या सरावासाठी तिचे पालक तिला नियमितपणे कांदिवलीवरून ठाणे येथील श्री मावळी मंडळ संस्थेत येण्यासाठी जवळपास २ तासांचा रोजचा प्रवास करतात.

तसेच नागपूर येथे आयोजित दुसऱ्या मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत दिव्याशी भौमिक हिने दुहेरी मुकुट पटकावला. सदर स्पर्धेत मुलींच्या १३ वर्षा खालील गटात अंतिम फेरीत ४-० अशा फरकाने जिंकली व १५ वर्षा खालील गटात आंतरराष्ट्रीय खेळाडू जेनिफर वर्गीस हीचा अटीतटीच्या सामन्यात ४-३ असा पराभव करून दुहेरी मुकुट संपादित केला

 

टॅग्स :मुंबईकांदिवली पूर्वटेबल टेनिससुवर्ण पदक