मुंबईकरांना अधिक दाबाने मिळणार पाणी

By Admin | Updated: September 4, 2014 03:18 IST2014-09-04T03:17:56+5:302014-09-04T03:18:52+5:30

मुंबईकरांना अधिक दाबाने पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी मुंबई महापालिकेने हाती घेतलेल्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या लेक टॅपिंगचा अखेरचा टप्पा बुधवारी यशस्वीरीत्या पार पडला.

Mumbaikars will get more pressure to get water | मुंबईकरांना अधिक दाबाने मिळणार पाणी

मुंबईकरांना अधिक दाबाने मिळणार पाणी

मुंबई : मुंबईकरांना अधिक दाबाने पाणी उपलब्ध  व्हावे, यासाठी मुंबई महापालिकेने हाती घेतलेल्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या लेक टॅपिंगचा अखेरचा टप्पा बुधवारी यशस्वीरीत्या पार पडला. मोडकसागर तलावात दुपारी 1 वाजून 23 मिनिटांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कळ दाबून यशस्वीरीत्या लेक टॅपिंग केले. 
बुधवारी तलावातील तीन मीटरचा दगड सुरुंगाद्वारे फोडण्यात आला आहे. त्यामुळे तलावाशेजारील टेकडीवर बांधलेला जलबोगदा तलावाशी संलग्न झाला आहे. आता त्याद्वारे मुंबईला अधिक दाबाने मुबलक पाणी पुरविण्यात येणार आहे. म्हणजे या प्रयोगावर तब्बल 9 कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. लेक टॅपिंगमुळे तलावातील मृत पाणीसाठा पिण्यासाठी वापरता येणार असून, पाऊस लांबला तरी मुंबईकरांना फार काळ पाणीटंचाईच्या संकटाला सामोरे जावे लागणार नाही. दोन वर्षापूर्वी कोयना धरणात लेक टॅपिंगचा प्रयोग करण्यात आला होता. त्यानंतर हा दुसरा प्रयोगही यशस्वीरीत्या पार पडला आहे. आणि त्यामुळे मुंबईकरांना जादा पाणी उपलब्ध होईल, असा दावा महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी केला आहे.  (प्रतिनिधी)
 
18क् किलो डायनामाइट
मोडकसागरमध्ये लेक टॅपिंगसाठी 18क् किलो डायनामाइट वापरण्यात आले. कोयना धरणात करण्यात आलेल्या लेक टॅपिंगमध्ये तब्बल 1,6क्क् किलो डायनामाइट वापरण्यात आले होते. 
 
मोडकसागरला 55 छिद्रे
लेक टॅपिंगला लागणारे डायनामाइट लावण्यासाठी मोडकसागरला तब्बल 55 छिद्रे पाडण्यात आली होती. त्यात डायनामाइट बसवून त्याचा स्फोट करण्यात आला. मोडकसागरच्या तळाशी तब्बल 136 मीटर खोल लेक टॅपिंग करण्यात आले.

 ..तर वर्षभर पुरेल पाणी

मुंबईसाठीचा पाणीसाठा जूनमध्ये संपला तरी त्यानंतरही सुमारे दीड महिना 24 तास पाणी मुंबईकरांना या लेक टॅपिंगनंतर मिळणार आहे. पाणी जपून वापरल्यास हे पाणी वर्षभर मुंबईला पुरू शकते, असा दावा महापालिकेने केला आहे.

Web Title: Mumbaikars will get more pressure to get water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.