Join us

मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली! तानसा तलाव भरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 04:24 IST

बुधवारी रात्री मोडक सागर भरून वाहू लागला होता. आतापर्यंत चार तलाव भरल्याने मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे.

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव गुरुवारी सायंकाळी ७.०५ मिनिटांनी भरून वाहू लागला आहे. बुधवारी रात्री मोडक सागर भरून वाहू लागला होता. आतापर्यंत चार तलाव भरल्याने मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे.याआधी तुळशी आणि विहार हे दोन सर्वात लहान तलाव भरून वाहू लागले होते. मात्र त्यानंतरही तलाव क्षेत्रात ५० टक्कयांहून कमी जलसाठा असल्याने पाण्याचे टेन्शन वाढले होते. यामुळे पालिका प्रशासनाने ५ आॅगस्टपासून मुंबईत २० टक्के पाणीकपात लागू केली होती. परंतु मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी तलाव क्षेत्रात १ आॅक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर जलसाठा असणे अपेक्षित आहे. सध्या तलाव क्षेत्रात १२ लाख ६२ हजार ११९ दशलक्ष लीटर जलसाठा जमा झाला आहे. त्यामुळे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी २१ आॅगस्टपासून मुंबईतील २० टक्के पाणीकपात कमी करून १० टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे.>२० आॅगस्ट रोजी तलावांमध्ये जलसाठावर्ष जलसाठा टक्के(दशलक्ष लिटर)२०२० १२६२११९ ८७.२०२०१९ १३७०४३१ ९४.६८२०१८ १३३४९८२ ९२.२४तलाव कमाल किमान उपायुक्त सध्या(दशलक्ष) साठामोडक सागर १६३.१५ १४३. २६ १२८९२५ १६३.१५तानसा १२८.६३ ११८.८७ १३७८१५ १२८.६३विहार ८०.१२ ७३.९२ २७६९८ ८०.३०तुळशी १३९.१७ १३१.०७ ८०४६ १३९.२६तलाव कमाल किमान उपायुक्त सध्या(दशलक्ष) साठाअप्पर ६०३.५१ ५९७.०२ १६३२९९ ६०१.५३वैतरणाभातसा १४२.०७ १०४.९० ६१४५९५ १३८.२४मध्य वैतरणा २८५.०० २२०.०० १८१७४१ २८२.९५