Join us  

मुंबईकरांना उन्हाचे चटके; विदर्भाला पावसाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 7:04 AM

मुंबईचे कमाल तापमान ३७ अंशावर पोहोचले असून, उन्हाच्या झळांनी मुंबईकर घामाघूम होत आहेत. विशेषत: रात्रीच्या किमान तापमानातही आता वाढ नोंदविण्यात येत आहे

मुंबई : मुंबईचे कमाल तापमान ३७ अंशावर पोहोचले असून, उन्हाच्या झळांनी मुंबईकर घामाघूम होत आहेत. विशेषत: रात्रीच्या किमान तापमानातही आता वाढ नोंदविण्यात येत असून, किमान तापमानही २० अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. कमाल आणि किमान तापमान उत्तरोत्तर वाढतच जाणार असून, १८ मार्च रोजी विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, रविवारसह सोमवारी मुंबईत कमाल तापमानाची नोंद ३७ अंश सेल्सिअस झाली आहे. मंगळवारी किमान तापमान २० अंशांच्या आसपास होते. गेल्या २४ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. कोकण, गोवा, विदर्भाच्या कमाल तापमानात वाढ झाली आहे. विदर्भाच्या किमान तापमानात घट झाली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या किमान तापमानात वाढ झाली आहे.

टॅग्स :मुंबईविदर्भ