गेल्या दोन वर्षापासून मुंबईत सुरू असलेल्या मालमत्ता खरेदीच्या लाटेमध्ये मुंबईकरांनी सर्वाधिक पसंती ही पश्चिम उपनगरांना दिली असली तरी त्यातही सर्वाधिक खरेदी ही अंधेरी व त्याबाजूच्या परिसरात झाल्याचे दिसून आले आहे.
विशेष म्हणजे, गेल्या दोन वर्षांपासून मुंबईच्या मालमत्ता खरेदीत आतापर्यंत ७०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खरेदी करणाऱ्या बॉलीवूड कलावंतांनी अंधेरी व परिसरात सर्वाधिक खरेदी केल्याची माहिती बांधकाम उद्योगाचा अभ्यास करणाऱ्या एका खासगी कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, बॉलीवूड कलाकारांनी ७०० कोटी रुपयांची जी खरेदी मुंबईत केली आहे. त्यापैकी ४५० कोटी रुपयांची खरेदी ही अंधेरी व परिसरात केली आहे.
प्रवास झाला सुसह्य१. गेल्या दीड वर्षांत मुंबईत झालेल्या एकूण घर विक्रीत पश्चिम उपनगरातील घर विक्रीचे प्रमाण हे ५३ टक्के इतके नोंदवले गेले आहे. गेल्या काही वर्षांपासून मुंबईत सुरू असलेल्या पायाभूत सुविधांची काही कामे पूर्ण होऊन कार्यान्वित झाली आहे.
२. पश्चिम उपनगरातील प्रवास सुसह्य आणि वेळेची बचत करणारा ठरत आहे. पश्चिम उपनगरात मोठ्या प्रमाणावर जुन्हा इमारतीच्या पुनर्विकासाची कामे देखील सुरू आहे.
पश्चिम उपनगरांचे विशेष आकर्षणघर घरेदीसाठी लोक पश्चिम उपनगरांना पसंती दिल्याचे विश्लेषण केले जात आहे. दरम्यान गेल्या दोन वर्षांत अंधेरी पूर्व आणि पश्चिम परिसरात १२ हजार नव्या घरांची तर साडेतीन हजार नव्या कार्यालयांची निर्मिती झाली आहे.
आलिशान व्यावसायिक इमारतींची उभारणीअंधेरी परिसरात नामवंत खासगी विकासकांनी घरांसोबत आलिशान व्यावसायिक इमारतींची उभारणी केली. बॉलीवूडचा बहुतांश कारभार हा पश्चिम उपनगरात होत असल्यामुळे कार्यालय खरेदी करण्यास अभिनेते, निर्माते, दिग्दर्शकांनी पसंती दिली. ओशिवरा परिसरातील एका इमारतीमध्ये बिग-बी अमिताभ बच्चन, अजय देवगण, काजोल, कार्तिक आर्यन अशा दिग्गज कलावंतांनी कार्यालयाची खरेदी केली आहे.