Join us

मुंबईकरांना ग्रॅस्ट्रोची लागण, तीन महिन्यांत १ हजार ९६१ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 06:38 IST

गणेशोत्सवात पावसाचा लपाछपीचा खेळ सुरू असून, साथीच्या आजारांनी मात्र डोकेवर काढले आहे.

मुंबई  - गणेशोत्सवात पावसाचा लपाछपीचा खेळ सुरू असून, साथीच्या आजारांनी मात्र डोकेवर काढले आहे. यंदा गेल्या तीन महिन्यांत पालिकेच्या आरोग्य खात्याच्या अहवालानुसार, गॅस्ट्रोचे सर्वाधिक म्हणजे १ हजार ९६१ रुग्ण आढळल्याची नोंद आहे. त्या खालोखाल मलेरियाचे १ हजार ७४५ रुग्णांची नोंद झाली असून, त्यांच्यावर विविध रुग्णालय आणि दवाखान्यांत उपचार सुरू आहेत.यंदाच्या पावसाळ्यात शहर-उपनगरात स्वाइन फ्लूचा एकही रुग्ण आढळलेला नाही. या वर्षी मुंबई सोडून राज्याच्या अन्य भागांत स्वाइन फ्लूचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. यंदा मागच्या तीन महिन्यांत कॉलराचे सर्वांत कमी सात रुग्ण आढळले आहेत. याशिवाय, जून, जुलै, आॅगस्ट आणि सप्टेंबरचा पंधरवडा मिळून, तब्बल ४ हजार ७४८ डेंग्यूसदृश्य रुग्णांवर पालिकेच्या विविध रुग्णालयांत आणि दवाखान्यांत उपचार करण्यात आले.सध्या पावसाने दडी मारली असल्याने ठिकठिकाणी पाणी साचून राहते. त्यामुळे पाण्याचा निचरा न झाल्याने डासांची उत्पत्ती होते आणि आजार बळावतात. या लहान-सहान गोष्टींकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे, जेणेकरून या आजारांचे प्रमाण नियंत्रित करता येईल.वातावरणातील बदलांचा परिणामया साथीच्या आजारांविषयी फिजिशिअन डॉ. मंगेश राऊळ यांनी सांगितले की, वातावरणीय बदलांमुळे साथीच्या आजारांचे प्रमाण कमी-जास्त होते. 

टॅग्स :आरोग्यमुंबई