मुंबईकरांना ‘डोकेदुखी’

By Admin | Updated: April 19, 2015 02:07 IST2015-04-19T02:07:54+5:302015-04-19T02:07:54+5:30

तापमानाच्या चढत्या पाऱ्याने आणि उकाड्यामुळे मुंबईकरांचा डोकेदुखीचा आणि अर्धशिशीचा त्रास वाढत आहे. उकाड्यात शरीराच्या तापमानात वाढ होते.

Mumbaikars get 'headache' | मुंबईकरांना ‘डोकेदुखी’

मुंबईकरांना ‘डोकेदुखी’

तापमानाचा फटका : अर्धशिशी असणाऱ्यांचा त्रास बळावला
पूजा दामले - मुंबई
तापमानाच्या चढत्या पाऱ्याने आणि उकाड्यामुळे मुंबईकरांचा डोकेदुखीचा आणि अर्धशिशीचा त्रास वाढत आहे. उकाड्यात शरीराच्या तापमानात वाढ होते. मेंदूला जास्त तापमान सहन होत नसल्याने अर्धशिशी आणि डोकेदुखीच्या घटना वाढत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
एप्रिल आणि मे महिन्यात मुंबईत तापमान सर्वाधिक असते. या काळात अर्धशिशीचा त्रास असणाऱ्या रुग्णांचा त्रास बळावतो. उन्हाळ्यात अर्धशिशीचा त्रास वाढल्याने मळमळणे, उलट्या होणे असाही त्रास होत असल्याचे नायर रुग्णालयाचे न्यूरोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. राहुल चकोर यांनी सांगितले.

डोकेदुखी टाळण्यासाठी योग्य वेळी आहार घेणे, उन्हात न फिरणे, तेलकट, तिखट पदार्थ खाणे टाळणे, हे साधे नियम पाळावेत. मात्र डोकेदुखी सुरू झाल्यावर पेन किलर, पॅरासिटमोलच्या गोळ्या घेणे योग्य नाही. उन्हाळ्यात अनेकांना डोकेदुखीचा त्रास होतो. पण, यावर उपाय म्हणजे उन्हात जाताना डोके झाकावे, तणाव घेऊ नये, पाणी प्यावे.
- डॉ. राहुल चकोर, न्यूरोलॉजी विभागाचे प्रमुख, नायर रुग्णालय

राज्याचा पारा चाळीशीच्या वर !
राज्यावरील अवकाळी पावसाचे सावट सरताच तापमानात वेगाने वाढ होऊ लागली आहे. शनिवारी राज्याचा पारा चाळीशीच्या वर गेला. शनिवारी सर्वाधिक

41.2
अंश सेल्सिअस तापमान जळगावमध्ये नोंदले गेले.

 

Web Title: Mumbaikars get 'headache'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.