मुंबईकरांनी अनुभवला दशकातील सर्वात उष्ण दिवस

By Admin | Updated: March 25, 2015 19:47 IST2015-03-25T19:47:25+5:302015-03-25T19:47:25+5:30

उन्हाळ्याचे चटके आता मुंबईकरांनाही बसू लागले असून मुंबईत आज (बुधवारी) दशकातील सर्वोच्च तापमानाची नोंद झाली आहे.

Mumbaikars experience the warmest day of the decade | मुंबईकरांनी अनुभवला दशकातील सर्वात उष्ण दिवस

मुंबईकरांनी अनुभवला दशकातील सर्वात उष्ण दिवस

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २५ - उन्हाळ्याचे चटके आता मुंबईकरांनाही बसू लागले असून मुंबईत आज (बुधवारी) दशकातील सर्वोच्च तापमानाची नोंद झाली आहे. मुंबईत आज सांताक्रूझमध्ये ४०.८ डिग्री सेल्सियस तर कुलाबा येथे ३६.३ डीग्री सेल्सियस ऐवढ्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर ठाण्यातील पाराही ४४ अंशांपर्यंत पोहोचल्याचे समजते.

मार्च महिना उजाडताच मुंबईसह राज्यभरातील पारा चढत आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत मार्च महिन्यात दशकातील सर्वाधिक तापमान नोंदवण्यात आला आहे. मुंबईतील पारा मार्चमध्ये ३५ अंशांपेक्षा जास्त गेला असून एप्रिल व मे महिना अद्याप बाकी आहे. मुंबईचा पारा चढल्याने रसवंती गृहांबाहेरील गर्दी वाढत असून स्कार्फ, टोपी, गॉगल विक्रेत्यांना अच्छे दिन आले आहेत.

 

Web Title: Mumbaikars experience the warmest day of the decade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.