Mumbaikars beware; ‘Nisarg’ will come today | मुंबईकरांनो सतर्क राहा; ‘निसर्ग’ आलाय

मुंबईकरांनो सतर्क राहा; ‘निसर्ग’ आलाय

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेले अडीच महिने कोरोनाचा सामना करणाऱ्या मुंबईकरांवर आता ‘निसर्ग’ चक्रीवादळाचे संकट घोंगावत आहे. या काळात मुंबईत पुढील दोन दिवसात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यानुसार राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या तीन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच मुंबईतील सहा प्रमुख चौपाट्यांवर ९३ जीवरक्षकांचे पथक दोन पाळ्यात पहारा देत आहेत. त्याचबरोबर फ्ल्ड रेस्क्यू टीमचे प्रशिक्षित दीडशे जवान दहा अग्निशमन केंद्रात तयार ठेवण्यात आले आहेत.


‘निसर्ग’ चक्रीवादळ ३ जून रोजी महाराष्ट्र आणि गुजरातच्या समुद्र किनाºयावर धडकणार असल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यातच अरबी समुद्राच्या आग्नेय दिशेसह पूर्व-मध्य अरबी समुद्र आणि लक्षद्वीपजवळ कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मुंबई, ठाणे, रायगडसह पश्चिम किनारपट्टीवर दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे राज्य सरकारने पालिकेच्या आपत्कालीन विभागाला सतर्क राहण्याचे निर्देशही दिले आहेत. या वादळाच्या वाºयाचा वेग ३ जून रोजी सायंकाळी प्रतितास १०५ ते ११० किमी इतका असणार आहे. 


या चक्रीवादळाचा परिणाम किनारपट्ट्यांवर अधिक जाणवणार असल्याने गिरगाव, दादर, जुहू, मालाड, अक्सा, गोराई आदी चौपाट्यांवर जीवरक्षक बोटी, जेटकी आणि सुरक्षा साधने तैनात ठेवण्यात आली आहेत.
तसेच नरिमन पॉइंट, वांद्रे, अंधेरी, मालाड, बोरीवली अशा सर्व फायर स्टेशन्सवर अग्निशमन दलाचे दीडशे प्रशिक्षण घेतलेले जवानही आवश्यक साधनसामग्रीसह तैनात ठेवण्यात आले आहेत. मात्र नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.


महापौरांनी घेतला आढावा
मुंबईत येणारे निसर्ग वादळ गेल्या काही वर्षांतील सर्वात मोठे चक्रीवादळ असले तरी पालिकेच्या माध्यमातून सर्व सुरक्षाव्यवस्था तैनात ठेवण्यात आल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. झाडे किंवा फांद्या कोसळल्यास त्या तातडीने उचलण्यासाठी कर्मचारी, साधनसामग्री तैनात ठेवण्यात आली आहे. धोकादायक ठिकाणच्या रहिवाशांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पाणी साचणाºया ठिकाणीही आवश्यक पंप बसवण्यात आले आहेत.

हे करा
च्बाल्कनीमध्ये कुंड्या, लटकणाºया वस्तू काढून ठेवाव्यात.
च्एखादी खिडकी अथवा काच सैल असल्यास ती पडणार नाही, याची काळजी घ्यावी. खिडकी पासून लांब राहावे.
च्दुचाकी वाहन सोसाट्याच्या वाºयाने दुसºया वाहनांवर अधळण्याचा धोका असतो. त्यामुळे आपली दुचाकी मेन स्टँडवर ठेवावी.
च्मोबाइल, पॉवर बँक चार्ज करुन ठेवावे. वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता असल्याने वॉटर प्युरिफायर बंद पडेल, त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा साठा करून ठेवावा.
च्घरात लहान मूल असल्यास प्रथम उपचार पेटी तयार करून ठेवावी. जेणेकरून आवश्यकता पडल्यास त्याचा वापर करता येईल. 
च्बाल्कनीमध्ये लावण्यात आलेला डिश टीव्ही मजबूत आहे का याची खात्री करावी.
च्घरातील एखाद्या इलेक्ट्रिक वस्तूमध्ये स्पार्क अथवा जळण्याचा वास आल्यास वीजपुरवठा खंडित करून इलेक्ट्रिशियनला बोलवावे.
काय करू नये 
च्अफवा पसरवू नये व अफवांवर विश्वास ठेवू नये.
च्चक्रीवादळाच्या काळात वाहन घेऊन घराबाहेर पडू नये. 
च्मोडकळीस आलेल्या इमारतीपासून लांब राहावे.
च्जखमी व्यक्तींना हलवण्याची घाई करू नये जेणेकरून त्यांना आणखीन दुखापत होईल.
च्तेल अथवा ज्वलनशील पदार्थ सांडू नये.

लालडोंगर येथील नागरिकांना स्थलांतरित होण्याचे आदेश
चेंबूरच्या लालडोंगर परिसरात डोंगरावर राहणाºया नागरिकांना स्थलांतरित होण्याचे आदेश देण्यात आले. पालिकेच्या एम पश्चिम विभागातील कर्मचाऱ्यांनी लालडोंगर विभागात येऊन डोंगराच्या कडेला राहणाºया नागरिकांना एका दिवसासाठी स्थलांतरित होण्यास सांगितले. आनंदनगर येथील पालिकेच्या शाळेत एका दिवसासाठी काही कुटुंबांना स्थलांतरित होण्यास सांगण्यात येत होते.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार मागील महिन्याभरात लालडोंगर परिसरात चोºयांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे घर सोडून गेल्यास चोरीची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच लालडोंगर परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने पालिकेच्या शाळेत सुरक्षित अंतर राखले जाईल का? असाही सवाल नागरिकांतर्फे उपस्थित करण्यात आला. तरीही काही मोजक्या कुटुंबांनी स्थलांतरित होण्यास संमती दर्शवली.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Mumbaikars beware; ‘Nisarg’ will come today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.