मुंबई- बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप नवव्या दिवशी मिटल्यानंतर मुंबईकरांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. मात्र, येत्या काही दिवसांत मुंबईकरांना आणखी एका संपाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेत गेल्या पाच वर्षांपासून वेतन करार झालेला नाही. हा प्रश्न तडीस लावण्यासाठी संप करायचा का, या मुद्द्यावर फेब्रुवारीत कर्मचाऱ्यांचे मतदान घेण्यात येणार आहे. फेब्रुवारीत पालिका कर्मचाऱ्यांचे मतदान घेण्यात येणार असून, कामगारांचा जो कौल असेल त्यानुसार पुढील पावले उचलली जातील, असे सांगण्यात येत आहे.
मुंबईकर पुन्हा धरले जाणार वेठीस, पालिका कर्मचारी फेब्रुवारीत पुकारणार संप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2019 19:31 IST