रंगात न्हाऊन निघाले मुंबईकर
By Admin | Updated: March 7, 2015 00:50 IST2015-03-07T00:50:44+5:302015-03-07T00:50:44+5:30
शहरातील रस्त्यापासून ते प्रत्येक गल्लीमध्ये शुक्रवारी धुळवडीची धूम पाहण्यास मिळाली. रंगाच्या विविध छटा घेऊन मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात रंगोत्सव साजरा केला.

रंगात न्हाऊन निघाले मुंबईकर
मुंबई : शहरातील रस्त्यापासून ते प्रत्येक गल्लीमध्ये शुक्रवारी धुळवडीची धूम पाहण्यास मिळाली. रंगाच्या विविध छटा घेऊन मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात रंगोत्सव साजरा केला. राज्यात अवकाळी पावसाचे भान ठेऊन अनेक मुंबईकरांनी साध्या पद्धतीने धुळवड साजरी केली.
मुंबइकर अनेक ठिकाणी बॉलीवूडच्या गाण्यांवर मुंबईकर थिरकताना दिसले. सकाळपासूनच रस्त्यावर लहान मुले आणि नागरिक हातात विविध रंगांचे फुगे आणि पिचकाऱ्या घेऊन एकमेकांवर रंगाची उधळण करीत होते. शहरातील तरुणांनी मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर धुळवड साजरी केली.
शिवाजी पार्क, गिरगाव या समुद्रकिनाऱ्यांवर आबालवृद्धांनी मोठी गर्दी केली होती. महालक्ष्मी येथील धोबीघाट परिसरात देहभान हरपून रंगोत्सव साजरा केला गेला. तरुणाईने विविध सामाजिक संदेश देणारी टी-शटर््स परिधान केले. बॉलीवूड व मराठी सिने तारे-तारकांनी धम्माल करीत रंगांचा सण साजरा केला. अवघ्या मराठी सिनेसृष्टीचे आकर्षण असणारी मराठी रंगकर्मींची खास होळी यंदा वांद्रे येथील ताज लॅण्ड्स एन्ड येथे साजरी करण्यात आली. प्रथमच पंचतारांकित हॉटेलमध्ये मराठी रंगकर्मींची रंगपंचमी साजरी झाली. यात अवधूत गुप्ते, अनिकेत विश्वासराव, श्रीरंग गोडबोले, स्पृहा जोशी, जितेंद्र जोशी, जयवंत वाडकर, सिद्धार्थ जाधव, पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे, संतोष जुवेकर, सुशांत शेलार, अमेय खोपकर, सुयश टिळक यांच्यासह शंभरहून अधिक टीव्ही व चित्रपट कलाकार सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
होळीच्या दोन दिवस आधीपासूनच व्हॉट्सअॅपवर ‘बुरा ना मानो होली हैं’ म्हणत होळी आणि रंगपंचमीच्या मेसेजे्सना सुरुवात झाली होती. शिवाय सगळ््या व्हॉट्सअॅपकरांचे डीपीज, स्टेटसही ‘होली स्पेशल’ अपडेट झाले. व्हॉट्सअॅपकरांनी तर ‘हे बारा गावच्या, बारा वेशीच्या बारा बावडीच्या बारा नाक्याच्या बारा गल्लीच्या देवा म्हाराजा’ म्हणत गाऱ्हाणे घातले. या गाऱ्हाण्याला तमाम नेटिझन्सने लाइक्स करीत जोरदार शेअरिंग केले.
यंदाची रंगपंचमी खास ठरली ती विश्वचषकाच्या सामन्यामुळे. दुपारनंतर मुंबईकरांनी रंगपंचमीसोबत हा सामनाही एन्जॉय केला. या सामन्यात ‘फिर एक बार मौका’ मिळाल्यामुळे मुंबईकरांनी खूश होऊन पार्टीही केली. रंगपंचमीच्या दिवशी सकाळपासूनच व्हॉट्सअॅपवर सगळ््यांचे डीपीज रंगांनी रंगलेल्या फोटोसनी ठेवले होते. तर स्टेटसवरही होळीच्या गाण्यांची झलक पाहायला मिळाली.
गुगलही रंगले
च्‘गुगल’च्या होमपेजवर रंगपंचमीनिमित्त आगळ््यावेगळ््या प्रकारे शुभेच्छा दिल्या जातात. रंगपंचमी हा सण भारतात सर्वत्र साजरा केला जातो.
च्त्यामुळेच गुगलनेही याची दखल घेत विशेष डुडल तयार केले. यावेळी गुगलने त्याच्या गुगल या अक्षरांवर अॅनिमेशनच्या माध्यमातून वेगवेगळे रंग उडवले. त्यामुळे गुगलही रंगपंचमीच्या रंगांत न्हाऊन निधाले.
च्मुंबई : होळीचा सण आवडत्या कार्टूनसोबत साजरा करण्याची संधी मिळाली तर कोणाला नाही आवडणार? हीच संधी ‘लोकमत बालविकास मंच’तर्फे चिमुकल्यांना देण्यात आली. एका खाजगी वाहिनीवरील ‘पकडम पकडाई’ हे कार्टून होळीच्या निमित्ताने ५ मार्च रोजी ‘लोकमत’च्या चिंचपोकळी कार्यालयात अवतरले आणि चिमुरड्यांच्या उत्साहाला एकच उधाण आले.
च्‘पकडम पकडाई’ला रंग लावण्यासाठी बालविकास मंचच्या चिमुकल्यांची कोण धावपळ झाली! कोणी गुलाबी, तर कोणी पिवळा रंग घेण्यासाठी घाई करीत होते. रंगपंचमीची अशी मजा घेताना मुलांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. रंगांची उधळण करण्याबरोबरच ‘पकडम पकडाई’तर्फे या सर्वांना भेटवस्तूही देण्यात आल्या. नैसर्गिक रंगांनी खेळताना सर्वांच्या आनंदाला उधाण आले.
च्‘पकडम पकडाई’सह फोटो काढण्यासाठी चिमुकल्यांची लगबग सुरू होती. अशी ही होळी बच्चेकंपनीच्या कायम स्मरणात राहील अशीच ठरली.