योग साधनेसाठी मुंबईकर सज्ज!

By Admin | Updated: June 21, 2015 02:14 IST2015-06-21T02:14:19+5:302015-06-21T02:14:19+5:30

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने शहर-उपनगरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात विविध ठिकाणी योगांचे महत्त्व सांगत ठिकठिकाणी योग

Mumbaikar ready for yoga tools! | योग साधनेसाठी मुंबईकर सज्ज!

योग साधनेसाठी मुंबईकर सज्ज!

मुंबई : आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने शहर-उपनगरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात विविध ठिकाणी योगांचे महत्त्व सांगत ठिकठिकाणी योग प्रात्यक्षिकेही करण्यात येणार आहेत. या योग साधनेत कधी नव्हे तर राजकीय मंडळीही पुढाकार घेऊन प्रात्यक्षिके सादर करणार आहेत.
प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीया विश्व विद्यालय यांच्या वतीने राजभवन येथे सकाळी ११ वाजता योग प्रात्यक्षिक शिबिराचे आयोजन केले आहे. तर केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री पीयूष गोयल आणि महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे मलबार हिल परिसरात योग प्रात्यक्षिके सादर करणार आहेत. मलबार हिल येथे सकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत पाटीदार हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडेल. वांद्रे हिंदू असोसिएशनतर्फे आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांच्या सहयोगाने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वधर्मीयांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. खार जिमखाना येथे सकाळी ७ ते ९ या वेळात होणाऱ्या या कार्यक्रमाला अभिनेते जॅकी श्रॉफ व राष्ट्रीय इस्लाम मस्जीद असोसिएशनचे व राष्ट्रीय मुस्लीम विधी महामंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष अल्हाजी मौलाना मुफ्ती मो. रइस अश्रफ अशरफी, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे उपस्थित राहतील.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मरिन ड्राइव्ह आणि नायगाव येथे पहाटे ६ वाजता कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमात मरोळ येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील ७०० पोलीस प्रशिक्षणार्थी दाखल झाले आहेत. या कार्यक्रमात सहभागी होऊन योग हा मनुष्याच्या जीवनासाठी महत्त्वपूर्ण असल्याचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविणार असल्याचे मरोळ पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य राजेंद्र डहाळे यांनी सांगितले. आयआयटी मुंबईच्या कॅम्पसमध्येही दुपारी चार वाजता विद्यार्थी आणि प्राध्यापक योगांचे सादरीकरण करणार आहेत.

कार्यक्रमांचे आयोजन
-केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री पीयूष गोयल आणि महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे मलबार हिल परिसरात योग प्रात्यक्षिके सादर करणार आहेत. मलबार हिल येथे सकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत पाटीदार हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडेल.
-वांद्रे हिंदू असोसिएशनतर्फे आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांच्या सहयोगाने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वधर्मीयांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.

Web Title: Mumbaikar ready for yoga tools!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.