Join us  

मुंबई देणार हवेची परीक्षा; प्रत्येक श्वास महत्त्वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 1:30 AM

गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रदूषित झालेल्या मुंबईच्या हवेची नोंद चक्क समाधानकारक झाली आहे

मुंबई : आपण कुठल्या गुणवत्तेच्या हवेत श्वास घेतोय, हा प्रश्न जर का तुम्हाला पडत असेल तर याचे उत्तरही तुम्हाला लवकरच मिळेल. मुंबईत यासंदर्भात जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, मोठ्या आकाराची फुप्फुसे वर्दळ असलेल्या रस्त्याच्या शेजारी लावण्यात आली आहेत. वाहनांमुळे व धुळीमुळे होणाऱ्या वायुप्रदूषणाची भीषणता या फुप्फुसांच्या रंग बदलण्यावरून आपल्याला समजून येणार असून, या माध्यमातूनच मुंबई हवेची परीक्षा देणार आहे.

फुप्फुसांच्या स्थापनेमुळे लोकांना हवा प्रदूषणाचा आपल्या शरीरावर तसेच श्वसनक्रियेवर होणारा परिणाम सहजरीत्या लक्षात येईल. ही कृत्रिम फुप्फुसे १४ जानेवारी रोजी वातावरण आणि झटका या पर्यावरणावर काम पाहणाºया संस्थांद्वारे, प्रत्येक श्वास महत्त्वाचा आहे असे म्हणणारा हा बिलीबोर्ड व त्यावरील फुप्फुसे वांद्रे येथील आर. डी. नॅशनल कॉलेजच्या बाहेर वर्दळ असलेल्या भागात रस्त्याशेजारी लावली आहेत. सद्यस्थितीत पांढरी दिसणारी ही फुप्फुसे बनवण्यासाठी हेपा फिल्टर्स वापरण्यात आले आहेत. हे फिल्टर्स आॅपरेशनसाठी, मास्क बनवण्यासाठी व धूळ पकडण्यासाठी वापरले जातात. या फुप्फुसांच्या मागे पंखे जोडले गेले आहेत. जे हवा खेचून घेतात. यामुळे संपूर्ण बिलीबोर्ड खºया फुप्फुसाचा आभास तयार करतो.

पुढील काही दिवसात हे फिल्टर्स हवेतील, वाहनातून निघणारे धूलिकण, पार्टिक्युलेट कण पकडण्यास सुरुवात करतील. त्यामुळे या कृत्रिम फुप्फुसांचा रंग बदलण्यास सुरुवात होईल. प्रदूषणामुळे या फुप्फुसांचा रंग काळा होईल. बिलीबोर्डवर फुप्फुसांबरोबर एक डिजिटल एअर क्वालिटी मॉनिटरही बसवण्यात आला आहे. या यंत्राद्वारे हवेच्या दर्जावर मिनीट टू मिनीट लक्ष ठेवणे शक्य होते.गरोदर बायकांमध्ये हवा प्रदूषणामुळे त्यांचा अर्भकांच्या फुप्फुसांवर परिणाम होतो. त्याचप्रमाणे त्यांच्या पुढील पिढीमधील नातू-पणतूतही अस्थमाचा त्रास दिसू शकतो. हवा प्रदूषण किती भयंकर आहे हे यावरून लक्षात येईल. - डॉ. संजीव मेहतापी.एम. २.५ पातळी जास्त आहे. श्वासांच्या आजारांव्यतिरिक्त हृदयाचे आजार, हृदयविकाराचा झटका, फुप्फुसांचा कर्करोग अशा आजारांचा धोका हवा प्रदूषणामुळे संभवतो. - डॉ. अमिता नेने, विभाग प्रमुख, श्वसन विभाग, बॉम्बे रुग्णालयया उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट राज्य सरकारचे हवा प्रदूषण या प्रश्नावर लक्ष वेधून, या समस्येचा समावेश सरकारच्या कॉमन मिनिमम प्रोग्रॅममध्ये करणे हे आहे. - भगवान केशभट, संस्थापक, वातावरण संस्थाकधी नव्हे ती मुंबईची हवा समाधानकारकगेल्या कित्येक महिन्यांपासून प्रदूषित झालेल्या मुंबईच्या हवेची नोंद चक्क समाधानकारक झाली आहे. मंगळवारसह बुधवारी सफरने केलेल्या नोंदीनुसार, मुंबईची हवा समाधानकारक नोंदविण्यात आली आहे़

टॅग्स :प्रदूषण