Join us  

पश्चिम रेल्वेवरील काम विक्रमी वेळेत पूर्ण, पहिली एक्स्प्रेस लोअर परळहून रवाना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2019 8:39 AM

पश्चिम रेल्वे मार्गावरील जम्बो ब्लॉक संपला आहे. लोअर परळ स्थानकाजवळील उड्डाणपुलाचे गर्डर काढण्यासाठी तसेच नवे टाकण्यासाठी आणि अन्य कामांसाठी वीकेण्डच्या दिवशी 11 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला होता.

ठळक मुद्देपश्चिम रेल्वेवरील काम विक्रमी वेळेत पूर्ण90 मिनिटं आधीच पश्चिम रेल्वेवरील काम पूर्ण

मुंबई - पश्चिम रेल्वे मार्गावरील जम्बो ब्लॉक संपला आहे. लोअर परळ स्थानकाहून रविवारी सकाळी 7.40 वाजता अवंतिका एक्स्प्रेस रवाना झाली आहे.  लोअर परळ स्थानकाजवळील उड्डाणपुलाचे गर्डर काढण्यासाठी तसेच नवे टाकण्यासाठी आणि अन्य कामांसाठी वीकेण्डच्या दिवशी 11 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. पश्चिम रेल्वेवरील गर्डरचे काम विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आले आहे. 90 मिनिटांपूर्वीच डिलाईन उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्याची माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 

धोकादायक डिलाईन पुलाचे तोडकाम शनिवारी (2 फेब्रुवारी) रात्री 10 वाजल्यापासून सुरू करण्यात आले. या वेळी पूल तोडण्यासाठी मोठमोठ्या क्रेन मदतीसाठी आणल्या होत्या. यासाठी दादर ते चर्चगेट रेल्वेसेवा विशेष मेगाब्लॉक घेत बंद करण्यात आली होती. 

अंधेरीतील गोखले उड्डाणपुलाकडील पादचारी पुलाच्या दुर्घटनेनंतर रेल्वे हद्दीतील 455 पुलांचा सुरक्षा आढावा घेण्यात आला. लोअर परळ स्थानकाजवळील पूल (डिलाईल पूल) गंजल्याचे स्पष्ट झाल्याने आयआयटीसह रेल्वेच्या संयुक्त समितीने पूल धोकादायक स्थितीत असल्यामुळे पश्चिम रेल्वेने पूल तोडून दुरुस्ती काम हाती घेतले.

 

(परेवरील 11 तासांच्या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल, दादर स्थानकामध्ये गर्दी)

(VIDEO : लोअर परळ स्थानकाजवळील जीर्ण पुलाचे गर्डर काढण्याच्या कामास सुरुवात)

 

 

टॅग्स :पश्चिम रेल्वेभारतीय रेल्वे