Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai: मालमत्ता कर अदा न करणाऱ्या व्यावसायिकांचे पाणी तोडणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 14:49 IST

मालमत्ता कर थकबाकीदारांविरोधातील कारवाईला मुंबई महापालिकेने आणखी वेग दिला असून पुढील दोन महिन्यांसाठी  कर वसुलीच्या दृष्टीने व्यापक मोहीम हाती घेतली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई: मालमत्ता कर थकबाकीदारांविरोधातील कारवाईला मुंबई महापालिकेने आणखी वेग दिला असून पुढील दोन महिन्यांसाठी  कर वसुलीच्या दृष्टीने व्यापक मोहीम हाती घेतली आहे. ज्यांनी अद्याप मालमत्ता कर भरला नाही, त्यांनी तो तत्काळ भरावा, ज्या प्रकरणात न्यायालयाचे कारवाई न करण्याबाबत आदेश असतील, अशी प्रकरणे वगळून मालमत्ता कर थकविणाऱ्या थकबाकीदारांवर जप्ती, लिलाव कारवाई करावी. तसेच वाणिज्यिक थकबाकीदारांची नळजोडणी खंडित करावी, असे स्पष्ट आदेश प्रशासनाने दिले आहेत.

मालमत्ताधारकांनी थकीत कर लवकरात लवकर भरावा, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी केले आहे. त्यांनी गुरुवारी कर निर्धारण व संकलन विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला.  या बैठकीस सहआयुक्त  विश्वास शंकरवार, सहायक आयुक्त गजानन बेल्लाळे आदी अधिकारी उपस्थित होते.कर भरण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करणाऱ्या थकबाकीदारांविरुद्ध जप्तीची  कारवाई तत्काळ करावी. या कारवाईमध्ये भूखंड, निवासी व व्यावसायिक इमारती, व्यावसायिक गाळे तसेच औद्योगिक गाळे यांचा समावेश करावा, असे जोशी यांनी सांगितले. 

‘थकीत मालमत्ता कराची १०० टक्के वसुली करा’

थकीत तसेच चालू आर्थिक वर्षातील मालमत्ता कराची १०० टक्के वसुली करावी. मालमत्तेचे क्षेत्रफळ, वापर व मालकीविषयक माहिती तातडीने अद्ययावत करून नव्याने कर योग्य ठरणाऱ्या मालमत्तांचा कर जाळ्यात समावेश करावा. दीर्घ कालावधीपासून कर न भरणाऱ्या मालमत्तांविरोधात विशेष मोहीम राबवावी, असे आदेशही अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai: Water supply to be cut for property tax defaulters!

Web Summary : Mumbai intensifies action against property tax defaulters. The municipality will disconnect water connections of commercial defaulters. Authorities aim for 100% recovery of current and outstanding taxes, urging immediate payment to avoid penalties.
टॅग्स :मुंबईमुंबई महानगरपालिका