मुंबई विद्यापीठाला ‘शिवोत्सव’चे सर्वसाधारण विजेतेपद
By Admin | Updated: February 14, 2017 19:34 IST2017-02-14T19:34:06+5:302017-02-14T19:34:06+5:30
लाप्रकारांच्या दमदार सादरीकरणाच्या जोरावर मुंबई विद्यापीठाने ३२ व्या आंतरविद्यापीठीय राष्ट्रीय ‘शिवोत्सव’ युवा महोत्सवाचे

मुंबई विद्यापीठाला ‘शिवोत्सव’चे सर्वसाधारण विजेतेपद
>ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 14 - कलाप्रकारांच्या दमदार सादरीकरणाच्या जोरावर मुंबई विद्यापीठाने ३२ व्या आंतरविद्यापीठीय राष्ट्रीय ‘शिवोत्सव’ युवा महोत्सवाचे सांघिक गटातील सर्वसाधारण विजेतेपद मंगळवारी पटकाविले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ उपविजेते ठरले. यजमान शिवाजी विद्यापीठाला शोभायात्रेतील उत्कृष्ट सादरीकरणाबाबत चौथा क्रमांक मिळाला. विविध कलाप्रकारांत महाराष्ट्रातील विद्यापीठांनी यश मिळवत बाजी मारली. गेल्या पाच दिवसांपासून शिवाजी विद्यापीठात रंगलेल्या, तरुणाईच्या कलाविष्काराने बहरलेल्या युवा महोत्सवाचा जल्लोषी वातावरणात समारोप झाला.