मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षा केंद्राची माहिती ऑनलाईन उपलब्ध
By रेश्मा शिवडेकर | Updated: March 20, 2024 20:32 IST2024-03-20T20:32:12+5:302024-03-20T20:32:58+5:30
एक लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे उपलब्ध.

मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षा केंद्राची माहिती ऑनलाईन उपलब्ध
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२३-२४च्या उन्हाळी सत्राच्या परीक्षेस २२ मार्चपासून सुरुवात होत आहे. आजपर्यंत पदवी परीक्षेच्या एक लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे देण्यात आली आहेत. त्याचबरोबर ऐनवेळेस काही परीक्षा केंद्रात बदल झाल्यास किंवा विद्यार्थ्यास त्याचे परीक्षा केंद्र तात्काळ समजण्यासाठी विद्यापीठाने ऑनलाईन प्रणाली विकसित केली आहे, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी त्याच्या लॉगिन मध्ये पीएनआर टाकल्यास त्याला त्याची परीक्षा, आसन क्रमांक व परीक्षा केंद्र याची त्याला तात्काळ माहिती मिळते. तसेच परीक्षेच्या प्रवेश पत्रात काही दुरूस्ती असल्यास विद्यार्थी महाविद्यालयास संपर्क साधून सुधारित प्रवेशपत्र प्राप्त करून घेऊ शकतो.
विद्यार्थ्यास त्याचे परीक्षा केंद्र व इतर माहिती विद्यापीठाच्या https://mum.digitaluniversity.ac/ या संकेतस्थळावर know your examination venue या लिंकवर मिळेल असे परीक्षा व निकाल कक्षाचे उपकुलसचिव नरेंद्र खलाने यांनी सांगितले.