Join us

जमिनीवर भरणी करण्याच्या वादात दोघे भाजले! मालवणी चर्चच्या पठाडेवाडीमधील प्रकार

By गौरी टेंबकर | Updated: April 8, 2024 11:33 IST

Mumbai Crime News: मालवणी गावात जमिनीवर भरणी टाकण्याच्या वादातून सोमवारी सकाळी दोघांवर जीवघेणा हल्ला करत त्यांना उचलून जवळच्या शेकोटीमध्ये फेकल्याचा आरोप करण्यात येत आहे.

- गौरी टेंबकरमुंबई - मालवणी गावात जमिनीवर भरणी टाकण्याच्या वादातून सोमवारी सकाळी दोघांवर जीवघेणा हल्ला करत त्यांना उचलून जवळच्या शेकोटीमध्ये फेकल्याचा आरोप करण्यात येत आहे. यात भाजजेल्या दोघांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले.याप्रकरणी पोलिसांकडून मात्र अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

मालाडच्या मालवणी चर्च परिसरात असलेल्या पठाडे वाडीमध्ये एका प्लॉटवर भरणीचे काम सुरू होते त्या दरम्यान हा प्रकार घडला. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, या ठिकाणी एक व्यक्ती प्लॉट वर भरणी टाकण्याचे काम करत होता. त्यानुसार भरणी चा ट्रक घेऊन चालक मुकेश धोत्रे आणि त्याचा हेल्पर भोला कश्यप सदर ठिकाणी आले होते. या दोघांसोबत तिथल्या काही स्थानिकानी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. हा वाद हाणामारीवर गेल्यावर या दोघांना बेदम मारहाण करत जवळच असलेल्या शेकोटीमध्ये फेकण्यात आले. त्यामध्ये भोला हा जवळपास २० टक्के भाजला असून मुकेशही गंभीर जखमी झाला आहे. हा प्रकार पैशाच्या मागणीवरून झाल्याची ही माहिती आहे. मात्र मालवणी पोलिसांनी याबाबत अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा दिलेला नसून तपास सुरू आहे.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारी