Join us

Mumbai: वरळी समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 08:45 IST

Mumbai: वरळी कोळीवाड्यानजीकच्या समुद्रात शुक्रवारी दुपारी पाचजण बुडाले. त्यातील तिघांना वाचविण्यात स्थानिकांना यश आले. तर सविता पाल (१२) आणि कार्तिक चौधरी (८) यांचा बुडून मृत्यू झाला. वाचलेल्या तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

मुंबई : वरळी कोळीवाड्यानजीकच्या समुद्रात शुक्रवारी दुपारी पाचजण बुडाले. त्यातील तिघांना वाचविण्यात स्थानिकांना यश आले. तर सविता पाल (१२) आणि कार्तिक चौधरी (८) यांचा बुडून मृत्यू झाला. वाचलेल्या तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोळीवाड्यातील हनुमान मंदिरालगतच्या विकास गल्ली परिसरातील समुद्र किनारी ही पाच मुले बुडत असल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होण्यापूर्वीच स्थानिकांनी तत्काळ पाच मुलांना बुडण्यापासून वाचवत खासगी वाहनांतून रुग्णालयात दाखल केले. या पाचपैकी कार्तिकी पाटील या मुलीला केईएम रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून, तिची प्रकृती चिंताजनक आहे. तर उर्वरित दोघांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. आर्यन चौधरी आणि ओम पाल या मुलांवर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.

टॅग्स :पाण्यात बुडणेमुंबई