मुंबई ते पॅरिस विस्ताराची सेवा सुरू; युरोपातील देशांसाठी विमानांच्या फेऱ्या वाढविल्या

By मनोज गडनीस | Updated: March 29, 2024 18:10 IST2024-03-29T18:05:43+5:302024-03-29T18:10:39+5:30

टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्स या दोन कंपन्यांची संयुक्त विमान कंपनी असलेल्या विस्तारा कंपनीने मुंबई ते पॅरिस अशी थेट विमानसेवा सुरू केली आहे.

Mumbai to Paris extension service begins; | मुंबई ते पॅरिस विस्ताराची सेवा सुरू; युरोपातील देशांसाठी विमानांच्या फेऱ्या वाढविल्या

मुंबई ते पॅरिस विस्ताराची सेवा सुरू; युरोपातील देशांसाठी विमानांच्या फेऱ्या वाढविल्या

मनोज गडनीस
मुंबई - टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्स या दोन कंपन्यांची संयुक्त विमान कंपनी असलेल्या विस्तारा कंपनीने मुंबई ते पॅरिस अशी थेट विमानसेवा सुरू केली आहे. आठवड्यातून पाच वेळा मुंबई ते पॅरिस थेट सेवा कार्यरत असेल.गेल्या दोन वर्षांपासून युरोपला जाणाऱ्या भारतीय प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.

त्या पार्श्वभूमीवर अनेक विमान कंपन्यांनी युरोपातील विविध देशांसाठी विमानांच्या फेऱ्या वाढविल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर विस्ताराने देखील मुंबईतून पॅरिससाठी थेट विमान सेवा सुरू केली आहे. दिल्लीनंतर पॅरिससाठी थेट सेवा सुरू होणारे मुंबई हे दुसरे शहर ठरले आहे. याचा फायदा केवळ पर्यटकांनाच होणार नाही, तर विविध उद्योग, व्यवसाय विशेषतः माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांना देखील या जोडणीचा मोठा फायदा होणार आहे.

Web Title: Mumbai to Paris extension service begins;