मुंबईची लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. मात्र, याच गर्दीत कधी काय होईल याचा नेम नसतो. नुकतीच कुर्ला रेल्वे स्थानकावर माणुसकी आणि तत्परतेचे दर्शन घडवणारी एक थरारक घटना घडली. धावत्या ट्रेनखाली जाणाऱ्या एका वृद्ध प्रवाशाला आपल्या जीवाची पर्वा न करता एका टीसीने मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. या घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे-सीएसएमटी लोकल ट्रेन कुर्ला स्थानकात आली असता ही घटना घडली. ट्रेन थांबत असताना एक वृद्ध प्रवासी डब्यातून उतरण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, वाढते वय आणि प्रवाशांच्या प्रचंड गर्दीमुळे त्यांचा अचानक तोल गेला. स्टेशनवर कर्तव्यावर असलेल्या एका टीसीने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून क्षणाचाही विलंब न लावता वृद्ध प्रवाशाच्या दिशेने धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे की, संबंधित टीसीने पूर्ण ताकदीनिशी वृद्धाला ओढून प्लॅटफॉर्मवर सुरक्षित बाजूला घेतले.
सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
या घटनेचा व्हिडिओ समोर येताच नेटकऱ्यांनी संबंधित टीसीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. "मुंबई लोकलमध्ये प्रवाशांसाठी असे सतर्क कर्मचारीच खरे सुरक्षा कवच आहेत," अशा भावना नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. रेल्वे प्रशासनानेही आपल्या कर्मचाऱ्याच्या या साहसाचे विशेष कौतुक केले असून, हे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी दिलेल्या प्रशिक्षणाचे आणि माणुसकीचे उत्तम उदाहरण असल्याचे म्हटले आहे.
Web Summary : A vigilant TC at Kurla station saved an elderly woman from being run over by a train. The woman lost her balance while disembarking; the TC's quick action averted tragedy. The video went viral, with praise for the TC's bravery.
Web Summary : कुर्ला स्टेशन पर एक सतर्क टीसी ने एक बुजुर्ग महिला को ट्रेन से कुचले जाने से बचाया। उतरते समय महिला का संतुलन बिगड़ गया; टीसी की त्वरित कार्रवाई से त्रासदी टल गई। टीसी की बहादुरी की वीडियो वायरल हो गई।