मुंबई शेअर बाजार 68 अंकांनी कोसळला
By Admin | Updated: November 13, 2014 23:34 IST2014-11-13T23:34:24+5:302014-11-13T23:34:24+5:30
पेट्रोल आणि डिङोलवरील अबकारी करात वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केल्यानंतर तेल कंपन्यांच्या समभागांनी बुडी मारली.

मुंबई शेअर बाजार 68 अंकांनी कोसळला
मुंबई : पेट्रोल आणि डिङोलवरील अबकारी करात वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केल्यानंतर तेल कंपन्यांच्या समभागांनी बुडी मारली. याचा परिणाम होऊन शेअर बाजार कोसळला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 68 अंकांनी कोसळून 27,940.64 अंकांवर बंद झाला.
औद्योगिक उत्पादनात वाढ झालेली असतानाही गुरुवारी शेअर बाजार कोसळला. सप्टेंबरमध्ये औद्योगिक उत्पादन 2.5 टक्क्यांवर गेले. हा तीन महिन्यांतील उच्चांक आहे. त्याच बरोबर ऑक्टोबरमध्ये महागाईचा दर 5.52 टक्क्यांर्पयत खाली आला आहे. याचा संयुक्त परिणाम सकाळी बाजारावर दिसून आला. सुरुवातीला बाजार तेजीत होता. त्यातच पेट्रोल-डिङोलवरील करवाढीची बातमी आली. त्यामुळे बाजाराचा नूरच पालटला. सटोडय़ांनी नफा वसुलीचे सत्र सुरू केले. जोरदार विक्री सुरू झाल्याने तेजीचे वारे नरमाईत बदलले. सार्वकालिक उच्चंकावर असलेला सेन्सेक्स भरभर खाली आला. मध्येच तो वरही जात होता. अशा अस्थिर वातावरणात 68.26 अंक गमावून सेन्सेक्स 27,940.64 अंकांवर बंद झाला. ही वाढ आदल्या दिवशीच्या तुलनेत 0.24 टक्के आहे.
50 कंपन्यांच्या समभागांचा समावेश असलेला निफ्टी 25.45 अंकांनी कोसळला. 0.30 टक्क्यांच्या या घसरणीनंतर निफ्टी 8,357.85 अंकांवर बंद झाला.
काल सेन्सेक्सने 28,008.90 अंकांवर ङोप घेऊन सार्वकालिक विक्रम केला होता. इंट्रा-डे ट्रेडिंगमध्ये सेन्सेक्स 28,125.48 अंकांर्पयत पोहोचला होता. विदेशी गुंतवणूकदारांची दमदार खरेदी आणि केंद्राने हाती घेतलेल्या आर्थिक सुधारणा या बळावर सेन्सेक्सने ही वाढ नोंदविली होती.
स्टॉक एक्स्चेंजने जारी केलेल्या आकडेवारीनुसार काल विदेशी संस्थांनी 459.47 कोटी रुपयांची शेअर खरेदी केली. 30 कंपन्यांच्या समभागांचा समावेश असलेल्या सेन्सेक्सने गेल्या 3 सत्रंत 140.27 अंकांची कमाई केली आहे. ही वाढ 0.50 टक्के आहे.
ब्रोकरांनी सांगितले की, ऑईल मार्केटिंग कंपन्यांच्या समभागांत नफा वसुली दिसून आली. बँकांचे समभागही नरमाईतच होते. आयटी आणि औषधी क्षेत्रतील कंपन्यांनी सेन्सेक्सला तारले. सरकारी मालकीच्या बीपीसीएल, एचपीसीएल आणि इंडियन ऑईल या कंपन्यांचे समभाग 6.11 टक्क्यांनी कोसळले. ओएनजीसीचे शेअर 2.03 टक्क्यांनी कोसळले. रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग 0.53 टक्क्यांनी खाली आले. (प्रतिनिधी)
4सेन्सेक्समधील एसएसएलटी, टाटा पॉवर, ओएनजीसी, गेल, अॅक्सिस बँक, हीरो मोटोकॉर्प, एसबीआय, आयसीआयसीआय बँक या कंपन्यांचे शेअर्स कोसळले. इन्फोसिस, डॉ. रेड्डीज लॅब, सिप्ला यांचे शेअर्स वर चढले.
4बाजाराचा एकूण विस्तार नकारात्मक राहिला. 1,733 कंपन्यांचे शेअर्स कोसळले. 1,314 कंपन्यांचे शेअर्स वर चढले.