मुंबई - गोवा महामार्गावर एसटीची ट्रकला धडक

By Admin | Updated: September 14, 2014 23:02 IST2014-09-14T23:02:44+5:302014-09-14T23:02:44+5:30

मुंबई - गोवा महामार्गावर कर्नाळा पक्षी अभयारण्य येथे आज पहाटे ६ वाजता एसटी बस व ट्रकची समोरासमोर धडक बसली

Mumbai - ST trucks strike on Goa highway | मुंबई - गोवा महामार्गावर एसटीची ट्रकला धडक

मुंबई - गोवा महामार्गावर एसटीची ट्रकला धडक

तळोजा : मुंबई - गोवा महामार्गावर कर्नाळा पक्षी अभयारण्य येथे आज पहाटे ६ वाजता एसटी बस व ट्रकची समोरासमोर धडक बसली. अपघातात एसटीचालक जखमी झाला असून ट्रक चालकाचा मृत्यू झाला.
पेण येथून एसटी (एम.एच.२० डी. ९४३०) ही पनवेलकडे येत असताना कर्नाळा पक्षी अभयारण्य येथील घाटात वळणावर गोव्याकडे जाणाऱ्या ट्रकची (जी.अ‍े.०७ एफ. ३०६१) समोरासमोर धडक बसली. यात ट्रकचालक रामचंद्र देगन राय (३०) याचा जागीच मृत्यू झाला असून मृताला पनवेल ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. एसटीबस चालक अजगरअली अब्राहीम खान (५४) हा किरकोळ जखमी झाला असून उपचारासाठी कामोठे एमजीएम येथे दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची नोंद नवीन पनवेल पोलीस ठाण्यात केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Mumbai - ST trucks strike on Goa highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.