Join us  

'तो' फोटो अर्धाच, शिवजयंती विशेष अहवालात शिवाजी महाराजांना होतं मानाचं पान!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 3:15 PM

 मंगळवारी राज्यभरात शिवजयंती अगदी उत्साहात साजरी झाली. त्याचवेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो नसलेला शिवजयंतीच्या शुभेच्छा देणारा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

मुंबई -  मंगळवारी राज्यभरात शिवजयंती अगदी उत्साहात साजरी झाली. त्याचवेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो नसलेला शिवजयंतीच्या शुभेच्छा देणारा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. शिसेनेशी संबंधित असलेल्या साहेब प्रतिष्ठानने हा बॅनर लावल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र या दाव्याचा तपास केला असता या बॅनरचा अर्धाच भाग सोशल मीडियावर प्रसारित करून कुणीतरी खोडसाळपणा केल्याचे समोर आले आहे. तसेच साहेब प्रतिष्ठानच्या मुखपृष्ठावर छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण फोटो होता, असे उघड झाले आहे.  यासंदर्भात साहेब प्रतिष्ठानने आपली म्हणणे लोकमतकडे मांडले आहे, ''राजे शिवाजी उत्सव मंडळाच्या दशकपूर्ती महोत्सव वर्ष २०१९ (२३मार्च)  कलर पानांची स्मरणिका छापण्याचे काम चालू आहे पण काहि विरोधक साहेब प्रतिष्ठानच्या पानावरून फेसबुकवरती पोस्ट करुन हा बॅनर,आसल्याचे भासवून ह्या बॅनरवर आपल्या महाराजांचा फोटो दाखवणा-याला १ हजार रुपायांच बक्षिस देऊ असा दावा करत आहेत. मात्र हा दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे.  जर हा बॅनर खरा असेल तर त्या बॅनरचा फोटो किंवा शूटिंग आसेल तर आम्ही सुद्धा १०००० रुपये देऊ, असे आव्हान साहेब प्रतिष्ठानने दिले  आहे.  शिवसेनेशी संबंधित साहेब प्रतिष्ठानचा बॅनर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या बॅनरमध्ये शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह जवळपास 50 जणांचे फोटो आहेत. साहेब प्रतिष्ठान, भायखळा असा उल्लेख यावर आहे. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा असा मजकूर यावर आहे. मात्र यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो नाही. त्यामुळे शिवजयंतीचा हा बॅनर पाहा आणि शिवाजी महाराज शोधून दाखवा, असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र हा फोटो एडिट करून व्हायरल करण्यात आल्याचे समोर आले आहे.  

टॅग्स :मुंबईमहाराष्ट्र