Join us  

मुंबईसुद्धा महाबळेश्वरइतकीच गारेगार!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 2:47 AM

मुंबई आणि महाबळेश्वरचे किमान तापमान सोमवारी १६ अंश नोंदविण्यात आले आहे.

मुंबई : मुंबई आणि महाबळेश्वरचे किमान तापमान सोमवारी १६ अंश नोंदविण्यात आले आहे. गारव्यात वाढ झाल्यामुळे पहाटेच्या वेळी मुंबईकरांना महाबळेश्वरचा फील येत आहे. सोमवारी राज्यात सर्वांत कमी किमान तापमान नाशिकमधील निफाड येथे ९.०६ अंश नोंदविण्यात आले.गेल्या दोन दिवसांपासून मुंबईच्या किमान तापमानात घट नोंदविण्यात येत आहे. शनिवारी मुंबईचे किमान तापमान १८ अंश नोंदविण्यात आले होते. रविवारी यात आणखी एका अंशाची घट झाली आणि ते १७ अंशांवर घसरले. सोमवारी किमान तापमानात आणखी एका अंशाची घसरण झाली आणि मुंबईचे किमान तापमान १६ अंश नोंदविण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे मुंबईच्या कमाल तापमानातही घट नोंदवण्यात येत आहे. रात्री वाहणारे गार वारे गारठ्यात आणखी भर घालत आहेत.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे. मध्य महाराष्ट्रात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला, कोकण आणि मराठवाड्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे.

टॅग्स :मुंबईहवामान