मुंबई तापलेलीच!

By Admin | Updated: November 15, 2015 02:01 IST2015-11-15T02:01:34+5:302015-11-15T02:01:34+5:30

दिवाळी उलटली, तरीही अद्याप मुंबईकरांना थंडीची हुडहुडी भरलेली नाही. उलटपक्षी मुंबईचे कमाल तापमान थेट ३७-३६ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात येत आहे

Mumbai is the same! | मुंबई तापलेलीच!

मुंबई तापलेलीच!

मुंबई : दिवाळी उलटली, तरीही अद्याप मुंबईकरांना थंडीची हुडहुडी भरलेली नाही. उलटपक्षी मुंबईचे कमाल तापमान थेट ३७-३६ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात येत आहे. रात्री पडणारा काहीसा गारवा वगळता, दिवसभर उन्हाच्या तीव्र झळा बसत आहेत.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोकणातील काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय
घट झाली आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे.
शनिवारी राज्यात सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे १३.६ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे. दुसरीकडे १७ आणि १८ नोव्हेंबर रोजी दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
शहरांचे किमान तापमान
पुणे १५, महाबळेश्वर १५.८, नाशिक १३.६, उस्मानाबाद १५.९, नांदेड १४, गोंदिया १६ .
(प्रतिनिधी)

Web Title: Mumbai is the same!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.